फोटो सौजन्य - Sri Lanka Cricket
अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आशिया कपचा सामना काल पार पडला या सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाने अफगाणिस्तानला पराभूत करून सुपर ४ मध्ये स्थान पक्के केले आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या संघाचे सुपर ४ चे स्वप्न भंग झाले आहे. पहिल्या गटामधून भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ सुपर ४ साठी पात्र ठरले आहेत तर दुसऱ्या गटांमध्ये श्रीलंका आणि बांगलादेश हे दोन संघानी जागा पक्की केली आहे. आशिया कपमध्ये कोणते चार संघ एकमेकांच्या विरुद्ध लढणार आहेत आणि कोणते संघ हे पात्र ठरले आहेत यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारताच्या संघाचा आणखी एक साखळी सामना शिल्लक आहे हा सामना आज ओमान विरुद्ध खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने युएई आणि पाकिस्तान या दोन्ही संघाला पराभूत करून सुपर ४ मध्ये स्थान पक्के केले आहे. तर पाकिस्तानच्या संघाने ओमान आणि युएई या दोन्ही देशांना पराभूत करून सुपर ४ मध्ये जागा मिळवली आहे. ओमान आणि युएई हे दोन्ही संघ सुपर ४ मधून बाहेर झाले आहेत.
दुसऱ्या गटांमधील गणित थोडे मनोरंजक होते. दुसऱ्या गटाचा शेवटचा साखळी सामना हा काल पार पडला. अफगाणिस्तानच्या संघाला कालच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसऱ्या गटांमधील श्रीलंकेचा संघ सुपर ४ साठी पात्र ठरला आहे. श्रीलंकेच्या संघाने अफगाणिस्तान, ओमान आणि बांगलादेश या तीनही देशांना पराभूत करून सुपर ४ मध्ये स्थान पक्के केले आहे. बांगलादेश संघ सुपर ४ मध्ये स्थान पक्के करण्यासाठी यशस्वी झाला आहे.
Sri Lanka hold their nerves and go over the line! ✌️
🧊 in their veins & composure in their demeanor equates to thrilling win and 🇱🇰 + 🇧🇩 advancing to the Super 4!#SLvAFG #DPWorldAsiaCup2025 #ACC pic.twitter.com/E91eUJ7Hga
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 18, 2025
सुपर 4 चा पहिला सामना हा बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना हा भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये रंगणार आहे. भारतीय संघासमोर आणखी एकदा पाकिस्तानचे आव्हान असणार आहे. टीम इंडियाने या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. श्रीलंकाच्या संघाने अफगाणिस्तानच्या संघाला पराभूत करुन सुपर 4 मध्ये जागा मिळवली आहे. सुपर 4 मध्ये 6 सामने खेळवले जाणार आहेत.