आशिया कप २०२५ बद्दल काही मोठ्या बातम्या समोर येत आहेत. अलिकडेच एसीसीच्या बैठकीत आशिया कप आयोजित करण्याबाबत चर्चा झाली. दरम्यान, स्पर्धेची संभाव्य तारीख जाहीर झाली आहे. आशिया कपमध्ये खेळणाऱ्या संघांची माहितीही समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांशी भिडताना दिसत आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आशिया कप २०२५ ८ सप्टेंबर रोजी सुरू होऊ शकतो आणि ही स्पर्धा २८ सप्टेंबरपर्यंत चालू शकते. भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, पाकिस्तान, यूएई, ओमान आणि हाँगकाँग हे संघ सहभागी होणार असल्याचेही समोर आले आहे. पूर्वी आशिया कप भारतात होणार होता पण आता ही स्पर्धा दुबई आणि अबुधाबीमध्ये खेळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या बदलामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले असेल.
अलिकडच्या काळात भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता ही वेगळ्या स्तरावर असते. अलिकडेच WCL मध्ये, इंडिया चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्स विरुद्ध खेळण्यास नकार दिला. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरही याच कारणावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड यांच्यामध्ये स्पर्धा सुरू आहेत यामध्ये भारताचे काही खेळाडू आहे पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास मनाई केली. हरभजन सिंग, युसिफ पठाण, इरफान पठाण, शिखर धवन, या दिग्गज खेळाडूंने पाकिस्तान विरुद्ध सामने खेळण्यास मनाई केल्यामुळे डब्ल्यूसीएलला भारत पाकिस्तान सामन रद्द करावा लागला. त्याचबरोबर हॉकी स्पर्धेचे आयोजन भारतामध्ये होणार आहे, आता पाकिस्तानी देखील भारतामध्ये संघ पाठवण्यास मनाई केली आहे त्यामुळे हा वाद आणखीनच वाढत चालला आहे.
🚨 ASIA CUP 2025 IS LIKELY TO BE PLAYED FROM SEPTEMBER 8 TO 28 🚨 (Gaurav Gupta/TOI). pic.twitter.com/qzDVqXUrH8
— Tanuj (@ImTanujSingh) July 24, 2025
या सामन्याबाबत सोशल मीडियावर चाहत्यांचे वेगवेगळे मत आहे. काही लोक भारताने कोणत्याही प्रकारे पाकिस्तान विरुद्ध खेळू नये असे वाटत आहे, तर काहींना हा सामना हवा आहे. BCCI चा अंतिम निर्णय काय असेल हे पाहणे बाकी आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मैदानावर शेवटचा सामना २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाहायला मिळाला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत २४१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, भारताने ४ विकेट्स गमावून २४२ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पार केले.