Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: फायनलमध्ये अंतिम पंघालची झुंज अपुरी! कुस्तीत भारताला सिल्व्हर मेडल, पदकसंख्येत आणखी भर

Antim Panghal won the silver medal in Wrestling Asian Games: अंतिम पंघालने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. तिने रौप्य पदक जिंकून भारताला गौरव मिळवून दिला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 03, 2026 | 08:12 PM
Antim Panghal won the silver medal

Antim Panghal won the silver medal

Follow Us
Follow Us:
  • अंतिम पंघालचा दमदार प्रवास
  • फायनलमध्ये पराभव
  • भारताला मिळालं रौप्य
आशियाई क्रीडा २०२६ च्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा जलवा कायम आहे. भारताची स्टार महिला कुस्तीपटू अंतिम पंघालने महिलांच्या ५३ किलो वजनी गटातील कुस्ती स्पर्धेत भारतासाठी रौप्य पदक पटकावले आहे. अंतिम सामन्यात पंघाल जपानच्या माओ कियोकाकडून १-९ ने पराभूत झाली. पंघालने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती, परंतु विजेतेपदाच्या लढतीत ती जपानी कुस्तीपटूच्या आव्हानाचा सामना करू शकली नाही. सामन्याच्या पहिल्या सत्रात कियोकाने २-० अशी आघाडी घेतली. पंघालने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसऱ्या सत्रात तिच्या पायाला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तिचा त्रास अधिकच वाढला आणि याचा फायदा घेत कियोकाने सातत्याने गुण मिळवले. यामुळे पंघालला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. यापूर्वी, अमन सेहरावतने पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटातील स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते.

IND vs WI 3rd ODI Live: आधी हिटमॅनची वादळी खेळी, मग राहुलचं झंझावाती शतक! टीम इंडियाने वेस्टइंडिजसमोर ठेवलं ३५२ धावांचं टार्गेट

अंतिम सामन्यात पंघालचा १-९ ने पराभव

भारतीय कुस्तीपटू अंतिम पंघाल जपानच्या मो कियोकाकडून १-९ ने पराभूत झाली, ज्यामुळे भारताला सुवर्णपदक गमवावे लागले. पंघालने पहिल्या सत्रात खराब कामगिरी केली. तिला पहिल्या सत्रात एकही गुण मिळवता आला नाही. पहिल्या सत्रात २-० अशी आघाडी घेतलेल्या जपानी कुस्तीपटूने दुसऱ्या सत्रातही वर्चस्व गाजवले. जपानी कुस्तीपटूने ७ गुण मिळवून भारतीय कुस्तीपटूला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. अंतिम गुणसंख्या १-९ अशी होती. या पराभवामुळे पंघाली सुवर्णपदक जिंकण्याची संधी हुकली आणि तिला रौप्यपदकावर समाधान मानले लागले.

अंतिम पंघालने ५३ किलो वजनी गटात दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत तिने कझाकस्तानच्या शुगायला ओमीरबेकला ९-० ने पराभूत केले. यानंतर, उपांत्यपूर्व फेरीत तिने उझबेकिस्तानच्या साकिबजमाल एस्बोसिनोवाला ८-० ने हरवले. उपांत्य फेरीत पंघालचा सामना चीनच्या झांग जिनशी झाला, जिथे सुरुवातीची आघाडी गमावल्यानंतर तिने शानदार पुनरागमन करत ६-१ ने विजय मिळवला.

भारताचे कुस्तीतील सहावे पदक

पंघालच्या रौप्यपदकामुळे, २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमधील भारताच्या पदकतालिकेत सहा पदके झाली आहेत. भारतीय कुस्तीपटूंनी आतापर्यंत या स्पर्धेत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली आहेत. याआधी, सुजीतने पुरुषांच्या ६५ किलो फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.पंघालच्या रौप्य पदकामुळे भारताच्या एकूण पदकांची संख्या ८४ झाली आहे. भारताने आतापर्यंत २० सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य पदके जिंकली आहेत.

Cricket: क्रिकेटविश्वात धावांचं महावादळ! ‘या’ फलंदाजाने उद्ध्वस्त केला Chris Gayle चा 175 धावांचा रेकॉर्ड; बनला T20 चा नवा King

Web Title: Asian games 2026 antim panghal won wrestling silver medal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • Antim Panghal
  • asian games 2026
  • Silver Medal
  • Wrestler

संबंधित बातम्या

Asian Games 2026: टीम इंडियाने रचला इतिहास! मलेशियावर मात करत हॉकीत सुवर्णपदक; थेट 2028 ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री
1

Asian Games 2026: टीम इंडियाने रचला इतिहास! मलेशियावर मात करत हॉकीत सुवर्णपदक; थेट 2028 ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री

Asian Games 2026: पराभवाच्या उंबरठ्यावरून थेट सुवर्णपदकावर झेप! कोरियाच्या हानवर Aman Sehrawat चा थरारक विजय,भारताने जिंकले GOLD
2

Asian Games 2026: पराभवाच्या उंबरठ्यावरून थेट सुवर्णपदकावर झेप! कोरियाच्या हानवर Aman Sehrawat चा थरारक विजय,भारताने जिंकले GOLD

IND vs PAK: वैभवला आऊट केल्यानंतर अभिषेक शर्माने घेतला बदला, 7 सिक्सर्स मारत केले रेकॉर्ड्स
3

IND vs PAK: वैभवला आऊट केल्यानंतर अभिषेक शर्माने घेतला बदला, 7 सिक्सर्स मारत केले रेकॉर्ड्स

IND vs PAK Final: अभिषेक-तिलकचा हल्लाबोल अन् शेवटच्या १२ चेंडूंचा थरार! पाकिस्तानला पुन्हा लोळवत टीम इंडियाने जिंकलं गोल्ड मेडल
4

IND vs PAK Final: अभिषेक-तिलकचा हल्लाबोल अन् शेवटच्या १२ चेंडूंचा थरार! पाकिस्तानला पुन्हा लोळवत टीम इंडियाने जिंकलं गोल्ड मेडल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.