IND vs WI 3rd ODI First Innings
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडन सील्सने भारतीय संघाला सुरुवातीलाच धक्के दिले. कर्णधार शुभमन गिल फक्त १ धावंवर पव्हेलियनमध्ये परतला. यानंतर स्टार फलंदाज विराट कोहली देखील शून्यावर तंबूत परतला. जेडन सील्सने दोन्ही फलंदाजांना बाद केले. त्यानंतर सलामीवीर रोहित शर्माने सूत्रे हाती घेतली आणि ९२ धावांची शानदार खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान रोहितने १० चौकार आणि ३ षटकार मारले. यासह, ‘हिटमॅन’ रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज म्हणून एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. रोहित बाद झाल्यानंतर, ऋतुराज गायकवाडने देखील शानदार फलंदाजी करत ५७ धावा ठोकल्या. त्याने अर्धशतक झळकावून डाव पुढे नेला.
मधल्या षटकांमध्ये विकेट पडण्याचे सत्र सुरुच होते, पण विकेटकीपर-फलंदाज केएल राहुलने एक बाजू खंबीरपणे सांभाळली. राहुलने आपला उत्कृष्ट फॉर्म दाखवत ८७ चेंडूंमध्ये नाबाद १२९ धावा केल्या. त्याने १० चौकार आणि षटकार ठोकत शानदार शतक झळकावले. त्याच्या या शतकाच्या जोरावर भारताने भक्कम स्कोअर उभा केला. अखेरीस, अंशुल कंबोजने १७ धावा आणि नमन धीरने ३० धावांचे योगदान देत संघाला ३५० धावांच्या पुढे नेले. वेस्ट इंडिजकडून जेडन सील्सने तीन, तर कीमो पॉलने दोन आणि गुडाकेश मोतीने एक विकेट घेतला.
1️⃣0️⃣,0️⃣0️⃣0️⃣ of the most 𝗞𝗟𝗮𝘀𝘀𝘆 𝗿𝘂𝗻𝘀🫡#TeamIndia vice-captain KL Rahul reaches a magnificent milestone in international cricket 👏👉 Updates ▶️ https://t.co/PhSJSbvW7C#INDvWI | @mflone_ | @klrahul pic.twitter.com/YfGWdgCXBj — BCCI (@BCCI) October 3, 2026
भारत: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अंशुल कंबोज, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार.
वेस्ट इंडिज : जॉन कॅम्पबेल, ज्युएल अँड्र्यू, शाई होप, अमीर जांगू, शेरफेन रदरफोर्ड, कीमो पॉल, मॅथ्यू फोर्ड, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, जेडेन सील्स, विटाले लावेस






