
IND W vs SL W Asian games Gold Medal Match
आशियाई क्रीडा २०२६ च्या ( Asian Games 2026) स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचे वर्चस्व कायम आहे. भारताने अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीत बांग्लादेशचा मोठ्या फरकाने पराभव केला. भारतीय संघाच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी आपल्या प्रभावी कामगिरी कायम ठेवली. आता, अंतिम सामन्यात श्रीलंकेला हरवून सुवर्णपदकावर संघाचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल. भारताने २०२३ मध्ये झालेल्या मागील स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्येआहे. नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये भारताने एकही सामना गमावला नाही. आता, या स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामना कधी, कुठे आणि किती वाजता होणार, जाणून घेऊयात.
पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदकाचा सामना २२ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार, सकाळी ५:३० वाजता सुरू होईल. तर, दुसरीकडे भारत आणि श्रीलंका यांच्यात सुवर्णपदकासाठी २२ सप्टेंबर रोजी भिडणार आहेत. हा सामना भारतीय प्रमावेळेनुसार, सकाळी १०:३० वाजता सुरू होईल. नुकत्याच झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यातही भारत आणि श्रीलंका एकमेकांसमोर आले होते, ज्यात भारताने एकतर्फी विजय मिळवून आशिया कप जिंकला होता. आता भारताचे लक्ष सुवर्णपदकावर लागले आहे.
भारताने उपांत्यपूर्व फेरीत जपानचा पराभव केला. उपांत्य फेरीत त्यांचा सामना बांग्लादेशविरुद्ध झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांग्लादेशसमोर १९६ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताकडून शफाली वर्माने ४९ चेंडूंमध्ये नाबाद १०० धावा करून अनेक मोठे विक्रम प्रस्थापित केले. मंधानाने ३७ धावा आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने ४० धावांचे योगदान दिले. बांग्लादेशची फलंदाजी खराब झाली आणि त्यांचा संघ ८१ धावांवर गारद झाला. भारताच्या फिरकीपटू नंदिनी शर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतले. भारताने हा सामना ११४ धावांनी जिंकला.
उपांत्य फेरीत श्रीलंकेचा सामना पाकिस्तानशी झाला. पाकिस्तानी संघ श्रीलंकेसमोर अजिबात टिकू शकला नाही. पाकिस्तान संघाने ४ विकेट्स गमावून १७७ धावा केल्या. श्रीलंकेने केवळ २ विकेट्स गमावून सहजपणे लक्ष्य गाठले. चमारी अटापट्टूने नाबाद ८३ धावा केल्या. या विजयासह श्रीलंकेनेही अंतिम फेरीत दमदारप्रवेश केला आहे. श्रीलंकेचे आता किमान रौप्य पदक निश्चित झाले आहे.