
Asian Games 2026 मध्ये नेमबाजांची कमाल (फोटो सौजन्य - X.com)
अवघ्या दोन मिनिटांत भारताने नेमबाजीत एक सुवर्ण आणि एक रौप्य अशी दोन पदके जिंकली. यामुळे भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत एक मोठी झेप घेतली आहे. यापूर्वी, एका सुवर्णपदकासह भारत १५ व्या क्रमांकावर होता, पण आता तो १२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. यावेळी भारताच्या खेळाडूंनी कमालीची कामगिरी करत भारतीयांचे मन जिंकून घेतलते आहे.
Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी टीमने लावला विजयाचा चौकार, जपानला नमवून सेमीफायनलमध्ये भरारी
जपानमध्ये आयोजित २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून भारतासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे. भारताने नेमबाजीत दोन पदके जिंकली आहेत. कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीने नेमबाजीत देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.
दरम्यान, भारतीय त्रिकुटाने पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन सांघिक प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक जिंकले. १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकाराच्या अंतिम फेरीत, कमलजीत आणि सुरुची सिंग या भारतीय जोडीने बलाढ्य दक्षिण कोरियन जोडीचा एकतर्फी पराभव करून भारताचा झेंडा व्यासपीठावर फडकवला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे भारताचे दुसरे सुवर्णपदक आहे.
India clinch first shooting gold medal of Asian Games 2026 !! Congratulations to Suruchi and Kamaljeet claim top spot in Mixed Team 10m Air Pistol 🇮🇳 pic.twitter.com/g0qCfgC2S8 — Kiren Rijiju (@KirenRijiju) September 25, 2026
पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स सांघिक प्रकारात, ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, रुद्राक्ष पाटील आणि नीरज कुमार यांच्या भारतीय संघाने अचूक नेमबाजीचे प्रदर्शन करत भारताच्या पदकतालिकेत रौप्य पदकाची भर घातली. पात्रता आणि सांघिक स्पर्धांमध्ये सातत्य दाखवत, भारतीय नेमबाजांनी दुसरे स्थान पटकावले आणि भारताचा झेंडा व्यासपीठावर फडकवला. त्यांच्या विजयानंतर अवघ्या दोन मिनिटांतच भारताने नेमबाजीत आणखी एक पदक जिंकले, पण यावेळी ते सुवर्णपदक होते.
Asian Games 2026: निशाणा असा लावला की…! अनंतजीत-परिनाज यांनी स्कीट मिक्स्ड टीममध्ये जिंकले Bronze
सकाळच्या पात्रता फेरीपासूनच भारतीय नेमबाजांचे वर्चस्व स्पष्ट दिसत होते. कमलजीत आणि सुरुची सिंग यांनी पात्रता फेरीत प्रथम क्रमांक पटकावून ५८७ गुणांचा नवा आशियाई विक्रम प्रस्थापित करत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. पात्रता फेरीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मंगोलियन संघावर ७० गुणांची मोठी आघाडी घेऊन त्यांनी आपला प्रबळ इरादा दाखवून दिला.