Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

White House: व्हाईट हाऊसजवळ जिममध्ये शिरून हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; 1 ठार, 4 जखमी अन् नंतर हल्लेखोरानेही संपवले जीवन

White House: वॉशिंग्टन डीसीमधील लोगन सर्कल येथे झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. व्यायामशाळेवर गोळीबार केल्यानंतर संशयित हल्लेखोर एका निवासी इमारतीत लपला होता. पोलिसांनी परिसराला घेराव घातला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 13, 2026 | 01:00 PM
Vida Fitness Gym Shooting Washington Washington DC Shooting News Today

Vida Fitness Gym Shooting Washington Washington DC Shooting News Today

Follow Us
Follow Us:
  • व्हाईट हाऊसजवळ थरारक गोळीबार
  • हल्लेखोराचा स्वतःवर गोळी झाडून अंत
  • परिसर सील आणि शाळांमध्ये लॉकडाऊन

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी पुन्हा एकदा गोळीबाराच्या आवाजाने हादरून गेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या ठिकाणी राहतात, त्या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या व्हाईट हाऊसपासून (White House) अवघ्या एक मैल अंतरावर असलेल्या ‘लोगन सर्कल’ (Logan Circle) परिसरात गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. या भीषण गोळीबारात एका निष्पाप व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत आणि घबराट पसरली असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संपूर्ण भागाला वेढा घातला आणि जवळच्या शाळांमध्ये लॉकडाऊन जाहीर केले.

सकाळच्या शांत वातावरणात लोक नेहमीप्रमाणे आपल्या कामाची आणि व्यायामाची सुरुवात करत असतानाच हा रक्तरंजित थरार घडला. वॉशिंग्टन डीसीमधील १५ व्या आणि पी स्ट्रीट्स एनडब्ल्यू (15th and P Streets NW) परिसरातील प्रसिद्ध ‘विडा फिटनेस’ (VIDA Fitness) या व्यायामशाळेत ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एक बंदूकधारी अचानक जिममध्ये शिरला आणि त्याने तेथे व्यायाम करणाऱ्या एका सदस्याच्या पाठीत आणि मानेवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. गोळी लागताच तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. जिममध्ये गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर इमारतीतून बाहेर पडला आणि त्याने रस्त्यावरही अंदाधुंद गोळीबार सुरू केला, ज्यामध्ये आणखी चार जण जखमी झाले.

जिममधील प्रत्यक्षदर्शींनी सांगितला तो भयावह अनुभव

गोळीबार झाला त्या वेळी जिममध्ये सुमारे ५० जण व्यायाम करत होते. अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे सुरुवातीला लोकांना वाटले की कोणाच्या तरी हातून जड वजन (Weights) खाली पडले असावे. मात्र, काही सेकंदांतच किंचाळ्यांचा आवाज सुरू झाला आणि गोळीबार झाल्याचे लक्षात येताच जिममध्ये एकच पळापळ सुरू झाली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nvidia: 33 वर्षांच्या सुवर्णयुगाचा शेवट! एनव्हिडियाचे संस्थापक जेन्सन हुआंग यांचा राजीनामा; कोण आहेत नव्या अंतरिम CEO कोलेट क्रेस?

त्या वेळी ट्रेडमिलवर धावणाऱ्या एका महिला साक्षीदाराने तो थरारक प्रसंग सांगताना म्हटले की, “ते दृश्य अत्यंत भयावह होते. मी एका जखमी व्यक्तीला जीव वाचवण्यासाठी इमारतीतून बाहेर पळताना पाहिले. त्याला गोळी लागली होती आणि त्या भागातून जाण्याशिवाय जिममधून बाहेर पडण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता.” जेव्हा ही महिला बाहेर येऊन एका पोलीस अधिकाऱ्याशी बोलत होती, तेव्हा तिला पुन्हा एकदा गोळीबाराचे आवाज ऐकू आले. अनेक व्यायाम करणाऱ्या सदस्यांनी जीव वाचवण्यासाठी आपत्कालीन दरवाजातून धाव घेत जवळच्या लॉन्ड्री रूममध्ये सुमारे २० मिनिटे स्वतःला कोंडून घेतले होते.

निवासी इमारतीत लपलेल्या हल्लेखोराचा स्वतःवर गोळी झाडून अंत

जिमबाहेर गोळीबार केल्यानंतर संशयित हल्लेखोर शेजारील एका सात मजली निवासी इमारतीच्या अपार्टमेंटमध्ये जाऊन लपला. घटनेची माहिती मिळताच अवघ्या ३० सेकंदांत वॉशिंग्टन डीसी पोलीस आणि स्वाट (SWAT) पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण इमारतीला घेराव घातला. या वेळी हल्लेखोराने बंद दरवाजाआडून पोलिसांच्या दिशेनेही दोन वेळा गोळीबार केला, तसेच अपार्टमेंटमधील गॅस पाईपलाईन तोडून आग लावण्याचाही प्रयत्न केला.

पोलिसांच्या विशेष निगोशिएशन (वाटाघाटी) पथकाने तब्बल तासभर हल्लेखोराशी संवाद साधून त्याला आत्मसमर्पण करण्यास समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक आतून आणखी एका गोळीचा आवाज आला. पोलिसांनी तात्काळ दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, हल्लेखोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला; त्याने स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन बंदुका जप्त केल्या आहेत. प्राथमिक तपासानुसार, हा हल्लेखोर त्याच जिमचा सदस्य होता आणि इमारतीच्या ‘होमओनर्स असोसिएशन’सोबत त्याचा काहीतरी वाद सुरू होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UAE मध्ये भरधाव ट्रकने 23 गाड्यांना चिरडल्यानंतर आगीचा भडका; 2 भारतीयांसह 14 जणांचा करुण अंत, 30 जण जखमी

संपूर्ण परिसर सील, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

या घटनेनंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी १५ व्या स्ट्रीटचा १५०० ब्लॉक परिसर पूर्णपणे रिकामा करून सील केला. या परिसरात विडा फिटनेस सेंटरसह सेंट ल्यूक्स एपिस्कोपल चर्च, अनेक निवासी घरे आणि प्रसिद्ध ‘होल फूड्स’ सुपरमार्केट आहे. नागरिकांना या भागाकडे न फिरकण्याचे आवाहन करण्यात आले आणि परिसरातील रहिवाशांना मोबाईलवर आणीबाणीचे संदेश पाठवून घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या गेल्या. तसेच, परिसरातील सर्व शाळांमध्ये तात्काळ लॉकडाऊन लागू करण्यात आले.

या मोठ्या कारवाईत स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी ‘फेडरल ब्युरो ऑफ अल्कोहोल, टोबॅको, फायरआर्म्स अँड एक्सप्लोझिव्ह्स’ (ATF) आणि एफबीआयचे (FBI) विशेष एजंट्सही घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यातील चार जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून, त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे, तर इतर तिघांची प्रकृती स्थिर आहे. वॉशिंग्टन डीसीच्या महापौर म्युरियल बाउझर यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, व्हाईट हाऊसला या संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वॉशिंग्टन डीसीमधील गोळीबार नेमका कोठे झाला?

    Ans: हा गोळीबार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसपासून अवघ्या एक मैल अंतरावर असलेल्या वॉशिंग्टन डीसीमधील 'लोगन सर्कल' (Logan Circle) परिसरातील १५ व्या आणि पी स्ट्रीट येथील 'विडा फिटनेस' जिममध्ये आणि बाहेर झाला.

  • Que: या गोळीबारात किती जणांचा मृत्यू झाला आणि हल्लेखोराचे पुढे काय झाले?

    Ans: या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. त्यानंतर शेजारील इमारतीत लपलेल्या संशयित हल्लेखोराने पोलिसांशी झालेल्या वाटाघाटीनंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

  • Que: गोळीबारानंतर प्रशासनाने काय पावले उचलली?

    Ans: पोलिसांनी १५ व्या स्ट्रीटचा परिसर पूर्णपणे सील केला, नागरिकांना घरातच राहण्याचे (Shelter-in-place) आदेश दिले आणि खबरदारीचा उपाय म्हणून जवळच्या सर्व शाळांमध्ये लॉकडाऊन लागू केले.

Web Title: Washington dc logan circle vida fitness shooting near white house 1 dead 4 injured hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • America
  • Shooting
  • US White House
  • World news

संबंधित बातम्या

Donald Trump: अमेरिकेचे इराणसोबतचे चर्चेचे दरवाजे बंद; ट्रम्प यांचा मोठा निर्णय, जेडी व्हान्स यांना दिली ‘ही’ नवीन जबाबदारी
1

Donald Trump: अमेरिकेचे इराणसोबतचे चर्चेचे दरवाजे बंद; ट्रम्प यांचा मोठा निर्णय, जेडी व्हान्स यांना दिली ‘ही’ नवीन जबाबदारी

Russia Ukraine War: पुतिन यांनी ट्रम्प यांच्या दूतांसोबत केली चार तास चर्चा, जाणून घ्या मग युक्रेनवर शांतता कराराला का दिला नकार?
2

Russia Ukraine War: पुतिन यांनी ट्रम्प यांच्या दूतांसोबत केली चार तास चर्चा, जाणून घ्या मग युक्रेनवर शांतता कराराला का दिला नकार?

Nvidia: 33 वर्षांच्या सुवर्णयुगाचा शेवट! एनव्हिडियाचे संस्थापक जेन्सन हुआंग यांचा राजीनामा; कोण आहेत नव्या अंतरिम CEO कोलेट क्रेस?
3

Nvidia: 33 वर्षांच्या सुवर्णयुगाचा शेवट! एनव्हिडियाचे संस्थापक जेन्सन हुआंग यांचा राजीनामा; कोण आहेत नव्या अंतरिम CEO कोलेट क्रेस?

UAE मध्ये भरधाव ट्रकने 23 गाड्यांना चिरडल्यानंतर आगीचा भडका; 2 भारतीयांसह 14 जणांचा करुण अंत, 30 जण जखमी
4

UAE मध्ये भरधाव ट्रकने 23 गाड्यांना चिरडल्यानंतर आगीचा भडका; 2 भारतीयांसह 14 जणांचा करुण अंत, 30 जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.