अनंतजीत-परिनाज यांनी जिंकले कांस्य (फोटो- ट्विटर)
रंजक झालेल्या अंतिम फेरीत भारतीय जोडीने ४४ पॉईंट्सची अचूक नेमाची नोंद करत हे पदक पटकावले. या स्पर्धेत चीनच्या संघाने गोल्ड तर दक्षिण कोरियाच्या संघाने सिल्व्हर मेडलवर आपले नाव कोरले. अनंतजीत आणि परिनाज या दोघांसाठीही चालू एशियन गेम्समधील हे दुसरे पदक ठरले आहे. यापूर्वी पार पडलेल्या पुरुष आणि महिलांच्या स्वतंत्र स्कीट संघ प्रकारात या दोघांनीही आपापल्या संघांना कांस्यपदक मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
Cricket: ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीग’मध्ये युवा क्रिकेटपटूंचा जलवा; पुण्याला चढला क्रिकेटचा ‘ज्वर’
Level with Kazakhstan at 346, the Indian trio of Anantjeet Singh Naruka, Mairaj Ahmad Khan and Bhavtegh Singh Gill prevailed in the shoot-off to secure a place on the podium! 🌟 Watch the 20th Asian Games Aichi-Nagoya 2026 on Sony Sports Network TV channels & Sony LIV.… pic.twitter.com/nGSZjDkp6k — Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 23, 2026
एशियन गेम्समध्ये पात्रता फेरीत सातत्यपूर्ण कामगिरी करत या भारतीय जोडीने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. शेवटच्या फेरीमध्ये दबावाखाली अनंतजीत आणि परिनाजने अचूक वेध घेत 44 पॉईंट्स प्राप्त केले आणि कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले. भारतीय नेमबाजी पथकाने सातत्याने पदकांची कमाई केली आहे. आतापर्यंत एशियन गेम्समध्ये भारताने 15 पदके जिंकली आहेत.
एशियन गेम्स २०२६ च्या शूटिंग रेंजवर भारतीय नेमबाजांचा फॉर्म अव्वल दर्जाचा राहिला आहे. स्कीट नेमबाजी स्पर्धेत भारताने तिसऱ्या पदकाची कमाई करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अनंतजीत सिंह नरोका आणि परिनाज धालीवाल या जोडीने स्कीट मिक्स्ड टीम प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे.
Asian Games 2026: बांग्लादेशला ‘हुतुतू’ समजेना! भारतीय कबड्डी संघाचा दणदणीत विजय
सध्या जपानमध्ये एशियन गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. बांग्लादेशचा पराभव करत भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या शानदार कामगिरीसह भारतीय संघाने स्पर्धेतील आपले पदकही निश्चित केले आहे.






