
Asian Para Games : पॅरा खेळाडूंचा ऐतिहासिक पराक्रम! पंतप्रधान मोदी 5 नोव्हेंबरला साधणार संवाद
या कार्यक्रमाला भारतीय पॅरा खेळाडू, प्रशिक्षक, भारतीय पॅरालिम्पिक समिती आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अधिकारी, राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे प्रतिनिधी तसेच युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
एशियन पॅरा गेम्स 2026 मध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. भारतीय खेळाडूंनी एकूण 114 पदकांची कमाई केली. यामध्ये 30 सुवर्ण, 35 रौप्य आणि 49 कांस्यपदकांचा समावेश आहे. 2023 मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या स्पर्धेत भारताने 111 पदके जिंकली होती. यंदा तीन पदकांची अधिक कमाई करत भारतीय खेळाडूंनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढला.
या ऐतिहासिक यशानंतर पंतप्रधान मोदी यांनी भारतीय पॅरा खेळाडूंचे कौतुक केले होते. 114 पदकांसह भारताने स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले होते. खेळाडूंच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे कौतुक करत त्यांच्या यशामुळे देशातील असंख्य नागरिकांना प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले होते.
ICC Ranking : कसोटीत स्टार्क पुन्हा अव्वल स्थानी, टी-20 मध्ये अय्यर 7 व्या स्थानी विराजमान
या स्पर्धेच्या पदकतालिकेत भारताने चौथे स्थान पटकावले. पॅरा अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक 65 पदके जिंकली. त्यामध्ये 22 सुवर्ण, 19 रौप्य आणि 24 कांस्यपदकांचा समावेश होता. पॅरा तिरंदाजी आणि पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताने प्रत्येकी तीन सुवर्णपदके जिंकली. तर नेमबाजीत दोन सुवर्णपदकांसह एकूण पाच पदकांची कमाई केली.
पदकतालिकेत चीनने 435 पदकांसह अव्वल स्थान मिळवले. जपान 186 पदकांसह दुसऱ्या, तर उझबेकिस्तान 145 पदकांसह तिसऱ्या स्थानी राहिला. भारताने 114 पदकांसह चौथे स्थान मिळवले, तर दक्षिण कोरियाने 100 पदकांसह पाचवे स्थान पटकावले.
Ans: पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 4.30 वाजता भारतीय पॅरा खेळाडूंशी संवाद साधणार आहेत.
Ans: नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे हा कार्यक्रम होणार आहे.
Ans: भारताने पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले.