
AUS vs ENG: Mitchell Starc's big feat! Created history in WTC; became the second Australian player to achieve such a feat
Mitchell Starc’s feat in WTC : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची अॅशेस मालिका सुरू आहे. या मालिकेतील दूसरा सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवण्यात येत आहे. या मालिकेदरम्यान, ऑस्ट्रेलियन अनुभवी मिचेल स्टार्कने एक मोठ्या टप्प्याला गवसणी घातली आहे. त्याने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ४६ धावा करून ही कामगिरी बजावली आहे. तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये १००० धावा आणि १०० विकेट्स घेणारा दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे.
या मालिकेत इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने चांगलेच अडचणीत आणणाऱ्या मिचेल स्टार्कची या सामन्यातील फलंदाजीने देखील सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. स्टार्कने १४१ चेंडूत ७७ धावा केल्या आहेत. त्याने या खेळीत १३ चौकार लगावले आहेत. या खेळीसह स्टार्कने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये १००० धावा देखील पूर्ण केल्या आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये १००० धावा पूर्ण करण्यासाठी स्टार्कला या सामन्यात ४३ धावांची गरज होती. त्याने ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या ९८ व्या षटकात हे लक्ष्य गाठले आहे.
हेही वाचा : IND vs SA : शुभमन गिल पूर्णपणे तंदुरुस्त, या तारखेला टीम इंडियाच्या जर्सीमध्ये करेल शानदार पुनरागमन!
स्टार्क हा WTC मध्ये १००० धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा नववा खेळाडू ठरला आहे. तो आता WTC मध्ये १००० धावा आणि १०० विकेट्स गाठणारा पॅट कमिन्स नंतर दुसराच ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. यापूर्वी ही कामगिरी करणारा पॅट कमिन्स हा एकमेव ऑस्ट्रेलियन खेळाडू ज्याने ही किमया साधली होती. आता या यादीत मिचेल स्टार्कचा देखील समावेश झाला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात फक्त पाच खेळाडूंनी १००० धावा आणि १०० विकेट्स घेण्याची किमया साधली आहे. यामध्ये रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, पॅट कमिन्स, ख्रिस वोक्स आणि मिचेल स्टार्क या खेळाडूंचा समावेश आहे.
१८ डिसेंबर २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या माजी भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या इतिहासात एक अनोखा विक्रम करणारा खेळाडू आहे. WTC मध्ये १००० धावा आणि १०० विकेट्स घेणारा अश्विन पहिला क्रिकेटपटू बनला होता. त्याने भारतासाठी एकूण ४१ WTC सामने खेळले, ज्यामध्ये १,१४२ धावा आणि १९५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
हेही वाचा : BCCI ने पुन्हा केलं करुण नायरला इग्नोर! दिल्या नाहीत वाढदिवसाच्या शुभेच्छा, सोशल मिडियावर उडाला गोंधळ
या दरम्यान, भारताच्या रवींद्र जडेजाने देखील असाधारण कामगिरी बजावली आहे. जडेजा हा WTC मध्ये २००० पेक्षा जास्त धावा करणारा आणि १०० पेक्षा जास्त विकेट्स घेणारा एकमेव खेळाडू आहे. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे तो WTC इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक ठरला आहे.