
फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये काही तासांमध्ये पाच सामन्याच्या मालिकेचा शुभारंभ होणार आहे. हि मालिका दोन्ही संघासाठी महत्वाची असणार आहे. ज्याप्रकारे या मालिकेसाठी खेळाडू उत्सुक आहेत त्याचप्रकारे क्रिकेट चाहते देखील या मालिकेसाठी उत्सुक आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिका शुक्रवारपासून पर्थमध्ये सुरू होत आहे. पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने गुरुवारी आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. जॅक वेदरल्ड आणि ब्रेंडन डॉगेट हे ३१ वर्षांचे दोन खेळाडू यजमान संघाकडून कसोटी पदार्पण करणार आहेत.
२०१९ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाकडून एकाच कसोटी सामन्यात दोन खेळाडू पदार्पण करणार आहेत. २०१०-११ च्या नवीन वर्षाच्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच अॅशेस मालिकेत दोन खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी देईल, जेव्हा उस्मान ख्वाजा आणि मायकेल बीअर यांनी पदार्पण केले होते. या सामन्याचे वेळापत्रक त्याचबरोबर या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
यावेळची अॅशेस कसोटी या पाच प्रतिष्ठित मैदानांवर खेळवली जाईल.
Steve Smith and Ben Stokes are all set for the Ashes summer as the fight for the urn begins 🤩🔥#WTC27 | #AUSvENG More 👉 https://t.co/PryfbM0na9 pic.twitter.com/jC1eZqYW7Q — ICC (@ICC) November 20, 2025
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची मालिका भारतीय वेळेनुसार भारतीय क्रिकेट चाहत्यांना पहिला सामना हा भारतामध्ये 7.50 वाजता पाहायला मिळणार आहे.या सामन्याचे नाणेफेक हे 7.20 वाजता होणार आहे. भारतीय प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर अॅशेस २०२५-२६ चे थेट प्रक्षेपण पाहता येईल. या सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅपवर पाहायला मिळणार आहे.
ऑस्ट्रेलियाची पहिल्या सामन्यात प्लेइंग 11
उस्मान ख्वाजा, जॅक वेदरल्ड, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, कॅमेरून ग्रीन, अॅलेक्स केरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, ब्रेंडन डॉगेट, स्कॉट बोलँड.
इंग्लंडचा 12 जणांचा संघ
बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, मार्क वूड.