फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. मालिकेतील शेवटचा सामना २४ ऑगस्ट रोजी खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार कामगिरी केली आणि २७६ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी शतके झळकावली, ज्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ खूप मागे पडला. तथापि, शेवटचा सामना गमावल्यानंतरही, दक्षिण आफ्रिकेने मालिका २-१ ने जिंकली.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांची मालिका पार पडलेल्या मालिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ही मालिका जिंकली आहे या मालिकेतील एक अविश्वसनीय क्षण पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू डेव्हॉड ब्रेव्हिसने एक असा फिल्डिंगचा स्तर उभा केला. त्याला पार करणे जवळजवळ कठीणच आहे. षटकार जाणारा चेंडू हा दोन धावांमध्ये संपवला. कमरेन ग्रीन याने मारलेला षटकार डेव्हॉड ब्रेव्हिस याच्या हातात आला पण त्याचा तोल गेल्यामुळे तो त्याने बाउंड्रीच्या आत मध्ये फेकला. पण तो चेंडू बाउंड्रीच्या आत न जाता बाउंड्रीच्या बाहेर गेला आणि त्याने बाउंड्रीच्या बाहेर हवेत राहून तो चेंडू पुन्हा एकदा बाउंडरच्या आत फेकलाआणि एक अविश्वासनीय क्षण पाहायला मिळाला.
What a brilliant effort from Dewald Brevis to Stop the Six 🥶🔥 pic.twitter.com/cMgnYdVKQ1
— The Brevis (@Ben10Brevis) August 24, 2025
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत २ गडी गमावून ४३१ धावा केल्या. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने १०३ चेंडूत १४२ धावा केल्या, तर मिचेल मार्शनेही १०६ चेंडूत १०० धावा केल्या. त्याने ६ चौकारांव्यतिरिक्त ५ षटकार मारले. याशिवाय कॅमेरॉन ग्रीनने ५५ चेंडूत ११८ धावा केल्या. त्याने ऑस्ट्रेलियाकडून दुसरे सर्वात जलद एकदिवसीय शतक ठोकले. अॅलेक्स कॅरीनेही ३७ चेंडूत ५० धावा केल्या.
४३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २४.५ षटकांत १५५ धावांवरच सर्वबाद झाला. एडेन मार्करामने ८ चेंडूत १ धाव केली, तर रायन रिकेल्टनने १२ चेंडूत ११ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या टेम्बा बावुमाने १० चेंडूत १९ धावा केल्या. टोनी डी झोर्झीने ३० चेंडूत ३३ धावा केल्या. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डेवाल्ड ब्रेव्हिसने २८ चेंडूत सर्वाधिक ४९ धावा केल्या. त्याच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून २२ वर्षीय कूपर कॉनोलीने ६ षटकांत २२ धावा देत ५ बळी घेतले.