AUS vs SA (Photo Credit -X)
AUS vs SA 3rd ODI: ऑस्टेलिया आणि दक्षिण आफ्रिका याच्यांत तीन सामन्याची एकदिवसीय मालिका (AUS vs SA) संपुष्टात आली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कांगारुने दक्षिण आफिकेचा २७६ धावांनी पराभव केला आहे. वनडे मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतरही ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने शेवटच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करत मालिका विजयाचा वचपा काढला. तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४३१ धावांचा विशाल स्कोर उभा केला आणि त्यानंतर अचूक गोलंदाजी व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत दक्षिण आफ्रिकेला २७६ धावांनी पराभूत केले.
With the series already won, South Africa will look to shrug this off
More stats: https://t.co/4l5slvXIKq | #AUSvSA pic.twitter.com/20nCO4TXKR
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 24, 2025
मॅककेच्या ग्रेट बॅरिअर रीफ एरिनामध्ये रविवारी (24 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. याआधीच्या दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे १९८ आणि १९३ धावांवर गारद झालेल्या ऑस्ट्रेलियाने यावेळी मात्र दमदार कमबॅक केले. ऑस्ट्रेलियाने केवळ २ गडी गमावून ४३१ धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या तीन फलंदाजांनी धमाकेदार शतके ठोकली, ज्यातील प्रत्येक शतक खास होते.
४३२ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव दिसला. त्यांनी ९ षटकांच्या आतच ५० धावांच्या आत ४ विकेट्स गमावल्या. युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने २८ चेंडूत ४९ धावांची आक्रमक खेळी करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण तोही लवकर बाद झाला. त्यांच्याव्यतिरिक्त फक्त टोनी डी जॉर्ज (३३) काही वेळ मैदानावर तग धरू शकला. अखेर दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ २५ षटकांत १५५ धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून २२ वर्षीय युवा फिरकीपटू कूपर कॉनोलीने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ५ बळी घेतले.