
AUS W vs SA W: India will face the Kangaroos in the Semifinal! Australia team tops after defeating South Africa
AUS W vs SA W, ICC Women’s Cricket World Cup 2025 : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये आज दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना खेळला गेला. हा सामान्य खूप कमी धावसंख्येचा ठरला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीला बोलवले. या सामन्यात अलाना किंग, अॅनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वोल यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका संघाला २४ ओव्हरमध्ये ९७ धावांवर गारद केले. प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलियाने धावांचा पाठलाग करत १६ ओव्हरमध्येच ३ विकेट्स गमावून ९८ धावांचे लक्ष्य सहज पूर्ण करून विजय मिळवला. आता ऑस्ट्रेलिया संघ पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहचला आहे. त्यामुळे आता २९ तारखेला होणाऱ्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे.
बेथ मूनी (४२) आणि वोल (३८*) यांनी सुरुवातीच्या विकेट्स गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९८ धावांच्या पाठलाग करतताना ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. गोलदाजांच्या शानदार कामगिरीनंतर, गतविजेत्या संघाने पॉवरप्लेमध्ये दोन विकेट्स गमावल्या. मॅरिझाने कॅपने तिच्या सलामीच्या स्पेलमध्ये फोबे लिचफिल्डला बाद करून ऑस्ट्रेलियाला सुरुवातीचा मोठा धक्का दिला.
हेही वाचा : IND vs AUS: नाद करा ‘हिटमॅन’चा कुठं! Rohit Sharma ने सिडनीमध्ये उनिव्हर्स बॉस क्रिस गेलचा विक्रम मोडला
दरम्यान, नादिन डी क्लार्कने मसाबाटा क्लासच्या चेंडूवर एलिस पेरीला माघारी पाठवले. बेथ मूनी ४२ धावा काढल्यानंतर नादिन डी क्लार्कने तिला माघारी पाठवले. नादिन डी क्लार्क १० धावांवर नाबाद राहिली. जॉर्जिया वोलने संघाचा विजय निश्चित केला.
त्याआधी, ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिका संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय योग्य ठरला. अलाना किंगने चेंडूने प्रचंड धुमाकूळ घातला आणि आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकात आतापर्यंतची सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारी नोंदवली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून लॉरा वोल्वार्ड ३१, सिनालो जाफ्ता २९ आणि नादिन डी क्लर्क १४ वगळता एका ही खेळाडूला दुहरी आकडा गाठता आला नाही आणि इंदूरमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला ९७ धावांवर रोखले. अलाना किंगने ७ षटकांत १८ धावा देत ७ विकेट्स घेतल्या, ज्यात दोन मेडन्सचा समावेश होता.
हेही वाचा : IND VS AUS: सिडनीत Rohit Sharma चे ‘डबल’ शतक! ODI क्रिकेटमध्ये गाठला ‘हा’ खास टप्पा
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा पहिला सेमीफायनल २९ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथे खेळवण्यात येणार आहे, ज्यामध्ये भारतीय संघ खेळणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत, चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारताचा सामना आता टेबल टॉपवर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघासोबत होणार आहे.