फोटो सौजन्य – X
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये WTC फायनलचा सामना पार पडला. या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा संघ हा वेस्ट इंडीज विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. ऑस्ट्रेलियन संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १५९ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. बार्बाडोसमधील विजयानंतर ऑस्ट्रेलियन दिग्गज नॅथन लायनने विजयाचे गाणे गायले नाही, तर गेल्या १२ वर्षांपासून तो सतत विजयानंतर गाणे गात होता.
नॅथन लायननेही जबाबदारी विकेटकीपर फलंदाज अॅलेक्स केरीकडे सोपवली. त्यानंतर नाथन लायन आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे का अशी अटकळ बांधली जात होती. तथापि, नंतर लियोनने याबद्दल सर्व काही स्पष्ट केले आहे. WTC फायनलमध्ये नॅथन लायन हा संघाचा भाग होता, पहिल्या डावामध्ये संघाने चांगली कामगिरी केली होती पण संघ हा दुसऱ्या डावामध्ये फार काही चांगली कामगिरी करु शकला नाही.
खरंतर, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना बार्बाडोसमध्ये खेळला गेला होता. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. यावेळी विजयानंतर विजयगीत नॅथन लायनने नाही तर अॅलेक्स केरीने गायले. त्याबद्दल नॅथन लायन म्हणाले, “सर्वप्रथम, संघाचे नेतृत्व करण्याचा मला खूप सन्मान वाटतो, परंतु १२ वर्षे विजयगीत गाणे ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठी कामगिरी आहे. याचा अर्थ असा नाही की मी निवृत्त होत आहे.”
Nathan Lyon has selected his successor after bringing an end his era as the Australian team song-master #WIvAUS https://t.co/Hndya9veag pic.twitter.com/Bhf9u5Bef7
— cricket.com.au (@cricketcomau) June 30, 2025
नाथन पुढे म्हणाला की, “मला ही जबाबदारी अशा खेळाडूला द्यायची होती जो मैदानाच्या आत आणि बाहेर खेळताना खूप छान दिसतो. मला यासाठी अॅलेक्स करी हा सर्वोत्तम उमेदवार वाटला. आता वेळ आली आहे की कोणीतरी यात योगदान द्यावे.”
नॅथन लायनने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी १३८ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने २५७ डावांमध्ये गोलंदाजी करताना ५५६ बळी घेतले आहेत. त्याच्या कसोटी कारकिर्दीत नॅथनने २४ वेळा ५ बळी आणि ५ वेळा १० बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.