फोटो सौजन्य - सोशल मीडिया
The Stuart MacGill Cocaine Case : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज स्टुअर्ट मॅकगिल यांच्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. स्टुअर्ट मॅकगिल कोकेन प्रकरणासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज स्टुअर्ट मॅकगिलला कोकेन व्यवहारात सहभागी असल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे त्याला मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पुरवठ्यात सहभागी असल्याबद्दल क्लीन चिट देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाच्या वृत्तानुसार, निकालादरम्यान तो कोर्टात डोके खाली ठेवून उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर फारसे भाव नव्हते. आता त्याला ८ आठवड्यांनंतर शिक्षा सुनावण्यात येणार आहे असे वृत्त समोर आले आहेत.
खरं तर, सिडनी जिल्हा न्यायालयाच्या ज्युरीने एप्रिल २०२१ मध्ये ५४ वर्षीय माजी ऑस्ट्रेलियन लेग-स्पिनर स्टुअर्ट मॅकगिलला ३३०,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स किमतीच्या एक किलो कोकेनच्या व्यवहारात सहभागी असल्याबद्दल निर्दोष ठरवण्यात आले होते. तथापि, त्याला ड्रग्ज पुरवठ्यात सहभागी असल्याचा दोषी आढळला आहे. कोर्टाला सांगण्यात आले की मॅकगिलने त्याचा नियमित ड्रग डीलर, जवळचा नातेवाईक, मारिनोस सोटिरोपौलोस याला सिडनीमधील त्याच्या रेस्टॉरंटमध्ये आणले होते. यावर मॅकगिलने सांगितले की त्याला कोकेन व्यवहाराची माहिती नव्हती. मग सरकारी वकिलांनी सांगितले की त्यांच्या सहभागाशिवाय हा करार शक्य झाला नसता.
याआधी, स्टुअर्ट मॅकगिल एक वर्षापूर्वी एका विचित्र अपहरण प्रकरणात चर्चेत आला होता. त्यानंतर त्याने आपले अपहरण झाल्याचा दावा केला. मॅकगिलचे अपहरण करणाऱ्या दोन भावांनी असा दावा केला की माजी क्रिकेटपटू स्वतःच्या इच्छेने त्यांच्यासोबत आला होता. या प्रकरणात, ड्रग्ज तस्करीची चर्चा होती.
मॅकगिलचा जन्म १९७१ मध्ये झाला आणि तो ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळला. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने ४४ कसोटी सामने आणि ३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यात त्याने ८५ डावात २०८ विकेट्स घेतल्या, तर फलंदाजीत त्याने ३४९ धावा केल्या. त्याने ३ एकदिवसीय सामने खेळताना ६ विकेट्स घेतल्या. १९९० च्या दशकात ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा स्टुअर्ट मॅकगिल जगातील सर्वोत्तम लेग स्पिनरमध्ये गणला जातो. तथापि, संघात शेन वॉर्नच्या उपस्थितीमुळे या खेळाडूला जास्त संधी मिळाल्या नाहीत.