फोटो सौजन्य - Star Sports सोशल मीडिया
Why did Mohammed Shami get off the stage during the Champion Trophy celebration : भारताच्या संघाने आयसीसीचे पाचवे जेतेपद नावावर केले आणि तर भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने पहिले जेतेपद जिंकले. सोशल मीडियावर त्याला मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. काही दिवसांपूर्वी मोहम्मद शमीने मैदानावर सामना सुरु असताना एनर्जी ड्रिंक पिले आणि त्यामुळे त्याला रोझा सुरु असताना देखील त्याने पिल्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. यावेळी अनेकांनी सोशल मीडियावर मोहम्मद शमीला सुनावले. आता सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे यामध्ये मोहम्मद शमीने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.
IPL 2025 : RCB च्या पहिल्या प्रॅक्टिस सेशनमध्ये विराट कोहली अनुपस्थित! सोशल मिडीयावर Video Viral
भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी स्टेजवरून खाली उतरला आहे. तर भारतीय खेळाडूंनी चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर संघांसाठी एक सामान्य परंपरा असलेल्या शॅम्पेनच्या बाटल्या उघडून आनंद साजरा केला. शमी स्टेजवरून का निघून गेला याचे नेमके कारण कळले नसले तरी सोशल मीडियावरील क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्रियेनुसार, इस्लाममध्ये दारू निषिद्ध मानली जात असल्याने त्याच्या धार्मिक श्रद्धेमुळे त्याने असे केले. त्यामुळे आता सोशल मीडियावर त्याचे या कृत्यामुळे कौतुक केले जात आहे आणि हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चॅम्पियन ट्रॉफीमधील मोहम्मद शमीच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने बांग्लादेश विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यांमध्ये त्याने ५ विकेट्स घेतले होते तर भारतासाठी तो सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. मोहम्मद शमीने नेहमीच संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे. २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती. विश्वचषक झाल्यानंतर त्याने त्याने त्याच्या पायाची सर्जरी केली होती त्यामुळे तो बराच काळ संघापासून दूर होता.
चॅम्पियन ट्रॉफी आधी तो रणजी सामन्यांमध्ये सहभागी झाला होता. त्यामध्ये त्याने चांगली कामगिरी केली त्याचबरोबर त्याने इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेचा देखील तो भाग होता. त्याची कामगिरी पाहून भारताच्या निवड समितीने त्याला संघामध्ये स्थान मिळाले. भारताच्या संघाने न्यूझीलंडच्या संघाला फायनलमध्ये पराभूत करून जेतेपद नावावर केले आहे. आता लवकरच मोहम्मद शमी आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. आयपीएल २०२५ मध्ये तो सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना दिसणार आहे. सनरायझर्स हैदराबादने त्याला आयपीएल २०२५ च्या ऑक्शनमध्ये १० कोटींना विकत घेतले.