Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG : आयुष म्हात्रेची गाडी सुसाट! वैभव सूर्यवंशीचा विक्रम खालसा; युवा कसोटीत अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू…

भारतीय अंडर-१९ आणि इंग्लंड अंडर-१९ संघादरम्यान दोन युवा कसोटी सामने खेळले गेले आहेत. या दरम्यान भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेने आपला सहकारी असलेला फलंदाज वैभव सूर्यवंशीचा विक्रम मोडला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 25, 2025 | 06:59 PM
IND vs ENG: Ayush Mhatre's car is good! Vaibhav Suryavanshi's record is Khalsa; The first player to achieve such a feat in a youth test...

IND vs ENG: Ayush Mhatre's car is good! Vaibhav Suryavanshi's record is Khalsa; The first player to achieve such a feat in a youth test...

Follow Us
Close
Follow Us:

Ayush Mhatre breaks Vaibhav Suryavanshi’s record:  भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. तर दुसरीकडे भारतीय अंडर-१९ आणि इंग्लंड अंडर-१९ संघादरम्यान युवा कसोटी सामने खेळले जात आहे. या सामन्यात, भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेने मोठा पराक्रम केला आहे. आयुष म्हात्रेने त्याचा सहकारी असलेला फलंदाज वैभव सूर्यवंशीचा विक्रम मोडीत काढला आहे.

दुसऱ्या आणि शेवटच्या युवा कसोटीच्या दुसऱ्या डावामध्ये आयुषने १५० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने शतक ठोकले आहे. यासह त्याने आपला सहकारी वैभव सूर्यवंशीचा विक्रम मोडला आहे. १८ वर्षीय आयुषने केवळ ८० चेंडूत १३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १२६ धावा फाटकावल्या आहेत. त्याने ६४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि ६८ व्या चेंडूवर षटकार मारून वैभवचा विक्रम खालसा केला.

हेही वाचा : IND vs ENG : Test cricket मध्ये तेंडुलकर-पॉन्टिंगनंतर Joe Root ची दहशत; मँचेस्टरमध्ये कॅलिस-द्रविडचा विक्रम मोडून रचला इतिहास

आयुषने मोडला ‘हा’ विक्रम

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या युवा कसोटी पदार्पणातील सामन्यात सूर्यवंशीने दुसऱ्या डावात ६२ चेंडूत १०४ धावा करून आपला प्रभाव पडला होता. डावखुरा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने १६७.७४ च्या स्ट्राईक रेटने धावा करून विश्वविक्रम केला होता, ज्यामध्ये १४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. १९ वर्षांखालील युवा कसोटीत १५० किंवा त्याहून अधिक स्ट्राईक रेटने सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आता आयुष म्हात्रेच्या नावे जमा झाला आहे.

दुसरी कसोटी अनिर्णित

इंग्लंड संघाने ३२४ धावांवर आपला डाव घोषित केला, ज्याच्या प्रत्युत्तरात विहान मल्होत्रा (१२०) आणि आयुष (८०) यांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने २७९ धावा केल्या होत्या. इंग्लंडने दुसऱ्या डावात ३५५ धावांचे लक्ष्य ठेवले, परंतु भारताने शेवटच्या दिवशी ६ बाद २९० धावा करून सामना अनिर्णित ठेवण्य्त यश मिळवले. आयुषशिवाय दुसऱ्या डावात इतर कोणत्याही फलंदाजाला महत्त्वपूर्ण योगदान देण्यात यश आले नाही.

या कसोटी मालिकेत आयुषने शानदार कामगिरी करत ४ डावात ३४० धावा फटकावल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतके आणि एक अर्धशतक झळकावले. त्याशिवाय विहान मल्होत्राने २७७ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले आहे. गोलंदाजीत आदित्य रावत आणि आर. अंबरीश यांनी ६-६ बळी टिपले आहेत.

हेही वाचा : IND vs ENG : Joe Root ची गाडी काही थांबेना! मँचेस्टरमध्ये रचला इतिहास; ‘असे’ करणारा बनला जगातील पहिला फलंदाज

 

Web Title: Ayush mhatre breaks vaibhav suryavanshis record great achievement in youth test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 06:59 PM

Topics:  

  • Ayush Mhatre
  • IND Vs ENG
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 
1

IND vs WI :’इंग्लंडमधील स्पर्धा कठीण, पण आत्मविश्वास…’, मोहम्मद सिराजकडून वेस्ट इंडिजविरुद्धच्या फॉर्मबाबत खुलासा 

India U19 vs Australia U19 : भारतीय १९ वर्षांखालील संघाचा ऑस्ट्रेलियामध्ये पराक्रम! ३६ वर्षांचा जुना विक्रम खालसा 
2

India U19 vs Australia U19 : भारतीय १९ वर्षांखालील संघाचा ऑस्ट्रेलियामध्ये पराक्रम! ३६ वर्षांचा जुना विक्रम खालसा 

Vaibhav Suryavanshi चे शतक ऑस्ट्रेलियासाठी ठरलं घातक! भारताने कांगारुनां 58 धावांनी केले पराभूत
3

Vaibhav Suryavanshi चे शतक ऑस्ट्रेलियासाठी ठरलं घातक! भारताने कांगारुनां 58 धावांनी केले पराभूत

IND U19 vs AUS U19 : ऑस्ट्रेलियामध्ये घोंघावले वैभव सूर्यवंशीचे वादळ! युवा कसोटीत झळकवले दुसरे शतक…
4

IND U19 vs AUS U19 : ऑस्ट्रेलियामध्ये घोंघावले वैभव सूर्यवंशीचे वादळ! युवा कसोटीत झळकवले दुसरे शतक…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.