
Bangladesh Cricket Board: T20 विश्वचषकाच्या वादावरून बांगलादेश क्रिकेट बोर्ड मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत पाहायला मिळाला आहे. अनेक चर्चा, आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला विश्वचषकामधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे त्यांच्या जागेवर स्कॉटलंडचा संघ भारतामध्ये होणाऱ्या विश्वचषकामध्ये खेळताना दिसणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने राजकारणाला आणून फक्त आयसीसीवरच अनेक आरोप केलेला आहे तर त्यांच्या खेळाडूंवर सुद्धा त्यांनी आरोप केले होते.
आता बांगलादेश क्रिकेट बोर्डा संदर्भात मोठी एक अपडेट समोर आली आहे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे वित्त समितीचे प्रमुख नजमूल इस्लाम यांचे बोर्डामध्ये पुनरागमन झाले आहे अशी माहिती समोर आली आहे. हे नक्की प्रकरण काय यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखांमध्ये देण्यात आली आहे. बीसीसीआयसोबत सुरू असलेल्या वादादरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या वित्त समितीचे प्रमुख एम. नझमुल इस्लाम यांनी माजी खेळाडू तमीम इक्बाल यांना भारतीय एजंट म्हटले. त्यांनी इतर वादग्रस्त विधाने देखील केली, ज्यामुळे खेळाडूंनी निषेध म्हणून बांगलादेश प्रीमियर लीगवर बहिष्कार टाकला. त्यानंतर, बीसीबीने नझमुल इस्लाम यांना बोर्डातून काढून टाकले. आता, वृत्तानुसार, नझमुल इस्लाम बोर्डात परतला आहे.
तमीम इक्बालला भारतीय एजंट म्हटल्यानंतर, एम. नझमुल इस्लाम यांनी सांगितले की, २०२६ च्या टी२० विश्वचषकातून बांगलादेशच्या खेळाडूंना वगळल्यास त्यांचे नुकसान होईल आणि त्यांना काहीही मिळणार नाही. यामुळे सर्व बांगलादेशी खेळाडू संतप्त झाले. त्यांनी बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळण्यास नकार दिला. त्यानंतर, खेळाडूंनी बांगलादेश क्रिकेटर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद मिथुन यांच्या नेतृत्वाखाली बोर्डाविरुद्ध पत्रकार परिषद घेतली.
नझमुल हुसेन शांतो, मेहदी हसन मिराज आणि लिटन दास हे देखील उपस्थित होते. खेळाडूंच्या निषेधामुळे, बीसीबीने एम. नझमुल इस्लामला काढून टाकले. आता, २०२६ च्या टी२० विश्वचषकातून वगळल्यानंतर, बोर्ड त्याच्या परतीची व्यवस्था करत आहे. बांगलादेशी माध्यमांमध्ये अलिकडच्या वृत्तांनुसार, बीसीबीला वाटते की एम. नझमुल इस्लाम यांचा प्रतिसाद सकारात्मक होता, म्हणूनच त्यांना आता पुन्हा संघात घेण्यात आले आहे.
Fight between BCB and its own Players , Bangladesh Board Betrays Its Own Players 🚨 – Nazmul had called Tamim Iqbal an “Indian agent” and insulted players publicly, He also said players don’t deserve payment if Bangladesh skipped the World Cup, – Players had earlier called off… pic.twitter.com/O2DYyIkKo2 — Aman (@PKohliReturns) January 26, 2026
बांगलादेश क्रिकेट बोर्डाला त्यांच्या खेळाडूंबद्दल काळजी करायची नाही. ते एक मजबूत भूमिका मांडू इच्छितात. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात सहभागी न होण्याचा निर्णय देखील बोर्डानेच घेतला होता. वृत्तांनुसार, या निर्णयाबाबत खेळाडूंशी कोणतीही चर्चा झालेली नाही. खेळाडू बोर्डाच्या निर्णयावर कशी प्रतिक्रिया देतात हे पाहणे बाकी आहे.