फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया
अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या गट टप्प्यातील सामने आता संपले आहेत. भारतीय अंडर-१९ संघाने त्यांचे सर्व गट टप्प्यातील सामने जिंकले. प्रत्येक गटातील शीर्ष तीन संघ सुपर ६ मध्ये पोहोचले. या टप्प्यात १२ संघ उपांत्य फेरीसाठी स्पर्धा करतील. सुपर ६ मध्ये, भारतीय संघ प्रथम झिम्बाब्वेशी आणि नंतर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करेल. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे पुन्हा एकदा मैदानात उतरतील. अंडर नाईन्टीन विश्वचषक आता पुढील टप्प्यात प्रवेश करणार आहे भारताच्या संघाने सुपर सहा मध्ये प्रवेश केला आहे.
सुपर सहाच्या पहिल्या गटामध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, वेस्टइंडीज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड हे संघ आहेत तर दुसऱ्या गटांमध्ये भारत, इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश, न्युझीलँड आणि झिम्बाब्वे या संघांचा समावेश आहे. भारताच्या अंडर नाईन्टीन संघाने लीक सामन्यांमध्ये एकही सामनांना गमावता सुपर सहा मध्ये प्रवेश केला आहे आता त्यांचा सुपर सहाचा पहिला सामना हा झिम्बाब्वे विरुद्ध खेळवला जाणार आहे. या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग त्याचबरोबर चाहतांना हा सामना कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर तपशील या लेखांमध्ये देण्यात आला आहे.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये होणारा हा सामना 27 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे हा सामना झिम्बाब्वे येथील बुलावायो येथील क्वीन स्पोर्ट्स क्लब मध्ये आयोजित केला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार या सामन्याची सुरुवात दुपारी 1 वाजता होणार आहे तर या सामन्याचे नाणेफेक 12.30 मिनिटांनी होणार आहे. टेलिव्हिजनवर पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी भारत विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही मोबाईलवर जिओ हॉटस्टारवर तुम्हाला पाहता येणार आहे.
Unbeaten India are improving with every performance at the #U19WorldCup, according to skipper Ayush Mhatre 💪 Details 👇 https://t.co/vYRxan7cPf — ICC (@ICC) January 25, 2026
भारतीय अंडर-१९ संघ
आयुष म्हात्रे (कर्णधार), आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, दीपेश देवेंद्रन, मोहम्मद एनान, आरोन जॉर्ज, अभिज्ञान कुंडू, किशन कुमार सिंग, विहान मल्होत्रा, उद्धव मोहन, हेनिल पटेल, खिलन पटेल, हरवंश पांगलिया, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी.
झिम्बाब्वे १९ वर्षांखालील संघ
नथानिएल हलाबंगाना, कुपाकवशे मुरादझी (wk), कियान ब्लिग्नॉट, ध्रुव पटेल, सिम्बराशे मुडझेनगेरे (c), ब्रँडन सेंजेरे, मायकेल ब्लिग्नॉट, लेरॉय चिवौला, ताटेंडा चिमुगोरो, पानशे माझाई, शेल्टन माझविटोरा, बेनी झुझे, मॅकडोनी ब्रॅन्डन, मॅकडोनी ब्रॅन्डी, मॅकडोनी, मॅडक्वीड






