Who is the boss of the most sixes in international cricket? 'This' Indian player has the world record
कसोटी, वनडे आणि टी २० या तिन्ही स्वरूपात सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम भारतीय फलदांज हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर जमा आहे. त्याने ५९७ षटकार ठोकले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन ख्रिस गेलला अनेक वर्ष झाली आहेत. तरी मात्र गेल या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी वीजमान आहे. गेलने ४८३ सामन्यांमध्ये ५५३ षटकार मारले आहेत.
तिसऱ्या स्थानी पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शाहिद अफ्रिदी हा विराजमान आहे. शाहिद अफ्रिदीने ५२४ सामन्यांमध्ये ४७६ षटकार खेचले आहेत.
या यादीमध्ये न्यूझीलंडचा माजी स्फोटक फलंदाज ब्रँडन मॅक्युलम चौथ्या क्रमांकावर आहे. मॅक्युलमने ४३२ सामन्यांमध्ये ३९८ षटकार लगावले होते.
या यादीमध्ये पाचव्या स्थानावर न्यूझीलंडचा आणखी एका फलंदाजाचा नंबर येतो. मार्टिन गुप्टील पाचव्या क्रमांकावर विराजमान असून त्याने ३६७ सामन्यांमध्ये ३८३ षटकार लगावले आहेत.
इंग्लंडचा विकेटकीपर बॅट्समन जोस बटलर सहाव्या स्थानी आहे. त्याने ३८४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत 369 षटकार मारले आहेत. बटलर अजून देखील क्रिकेट मध्ये सक्रिय आहे.
सातव्या स्थानी भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे नाव घ्यावे लागते. एम एस धोनीने ५३८ सामन्यांमध्ये ३५९ षटकार खेचले आहेत.