Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अफगाणिस्तानच्या यशात टीम इंडियासह बीसीसीआयचीसुद्धा मदत; अशी आहे इनसाईड स्टोरी

Afghanistan Cricket : T-20 World Cup 2024 स्पर्धेत अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारत इतिहास रचला. अफगाणिस्तानने मंगळवारी (25 जून) सुपर-8 फेरीत बांगलादेशला 8 धावांनी पराभूत केले आणि उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. अफगाणिस्तानचा सेमीफायनलमधील प्रवेश भारतामुळे सुकर झाला. यामागची इनसाईड स्टोरी वाचा.

  • By युवराज भगत
Updated On: Jun 25, 2024 | 09:31 PM
Afghanistan Cricket

Afghanistan Cricket

Follow Us
Close
Follow Us:

Afghanistan Cricket Team : अफगाणिस्तानने या स्पर्धेत केलेल्या कामगिरीने अनेकांना प्रभावित केले. काही वर्षांपूर्वीच क्रिकेट विश्वात पाऊल ठेवलेल्या अफगाणिस्तानने अगदी कमी वेळात मोठा पल्ला गाठला आहे. त्यांनी पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत आता प्रवेश केला आहे.

वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानची दमदार कामगिरी

या स्पर्धेत अफगाणिस्तानने न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांसारख्या बलाढ्य संघांना पराभूत करण्याचा कारनामा केला आहे. इतकेच नाही, तर 2023 वनडे वर्ल्ड कपमध्येही अफगाणिस्तानने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे अफगाणिस्तान करत असलेल्या प्रगतीबद्दल सध्याचा त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान अफगाणिस्तानच्या या आजपर्यंतच्या यशात भारत आणि बीसीसीआयचीही मोठी मदत झाली आहे. ही मदत कशी झाली, त्यावर एक नजर टाकू.

अफगाणिस्तानचे क्रिकेटविश्वात नुकतेच पाऊल

तर, अफगाणिस्तानने जेव्हा नुकतेच क्रिकेटविश्वात पाऊल टाकलेले होते आणि ते आपलं नाव बनवू इच्छित होते, त्यावेळी भारताने पुढाकार घेत त्यांना मदतीचा हात दिला होता. साल 2015 मध्ये अफगाणिस्तान संघासाठी भारतात सराव करीत होता. अफगाणिस्तानसाठी ग्रेटर नोएडामधील शाहिद विजय सिंग पाठीक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्यांचे तात्काळ घरचे मैदान झाले होते. तसेच अफगाणिस्तानने नंतर शारजामध्ये त्यांना तळ हालवला होता. पण 2017 मध्ये अफगाणिस्तान आयर्लंडविरुद्ध ग्रेटर नोएडा येथे आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते.

इतकेच नाही, तर डेहराडूनमध्येही अफगाणिस्तानने घरचे मैदान म्हणून बांगलादेशविरुद्ध टी20 मालिका खेळली होती. म्हणजेच ज्या ज्यावेळी अफगाणिस्तानला सुविधांची गरज होती, त्यावेळी भारतातील राज्य संघटना आणि बीसीसीआय यांनी पुढाकार घेतला होता.

भारतीय प्रशिक्षकांचे मार्गदर्शन

याशिवाय गेल्या काही वर्षात भारतीय प्रशिक्षकांचे मार्गदर्शन अफगाणिस्तानला लाभले आहे. लालचंद राजपूत, मनोज प्रभाकर आणि अजय जडेजा हे यापूर्वी अफगाणिस्तानच्या सपोर्ट स्टाफचा भाग राहिले आहेत. अजय जडेजा यांनी 2023 वनडे वर्ल्ड कपदरम्यान अफगाणिस्तान संघाचे मेंटॉर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी कोणतेही मानधन घेतले नव्हते.

आयपीएल क्रिकेट स्पर्धेतही अफगाणिस्तानचे खेळाडू

इतकेच नाही तर भारतातील एक मोठी टी20 क्रिकेट स्पर्धा असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतही अफगाणिस्तानचे अनेक खेळाडू खेळतात. त्यामुळे त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी तर मिळतेच, त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्याही मदत मिळते.

आयपीएलमध्ये अफगाणिस्तानच्या राशिद खान, मोहम्मद नबी, रेहमनुल्लाह गुरबाज, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी अशा अनेक खेळाडूंना संधी मिळाली आहे. एकूणच विचार करायचा झाल्यात अशा अनेक गोष्टींमुळे कळत-नकळत भारत आणि बीसीसीआयची मोठी मदत अफगाणिस्तानला झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Bccis help with team india in afghanistans success this is the inside story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2024 | 09:31 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket
  • bcci

संबंधित बातम्या

Kunar Earthquake : अफगाणिस्तान क्रिकेटने कुनार भूकंपग्रस्तांना पुढे केला मदतीचा हात, CSK च्या पोस्टने जिंकली चाहत्यांची मने
1

Kunar Earthquake : अफगाणिस्तान क्रिकेटने कुनार भूकंपग्रस्तांना पुढे केला मदतीचा हात, CSK च्या पोस्टने जिंकली चाहत्यांची मने

शुभमन गिल, रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह… BCCI च्या फिटनेस टेस्टमध्ये कोण पास आणि कोण नापास? जाणून घ्या सविस्तर
2

शुभमन गिल, रोहित शर्मा ते जसप्रीत बुमराह… BCCI च्या फिटनेस टेस्टमध्ये कोण पास आणि कोण नापास? जाणून घ्या सविस्तर

BCCI अध्यक्षांना पगार किती मिळतो? जाणून घ्या त्यांच्या कमाईचा फंडा!
3

BCCI अध्यक्षांना पगार किती मिळतो? जाणून घ्या त्यांच्या कमाईचा फंडा!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्माची मोठी परीक्षा! BCCI चा ‘हा’ नवा नियम ठरवणार ‘हिटमॅन’च्या कारकिर्दीचे भविष्य
4

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्माची मोठी परीक्षा! BCCI चा ‘हा’ नवा नियम ठरवणार ‘हिटमॅन’च्या कारकिर्दीचे भविष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.