Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 : ‘मला शिवीगाळ करण्यात आली…’ जेसन गिलेस्पीने ‘ते’ ट्विट डिलीट का केले? स्वत:च सांगितले कारण…

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मधून बांगलादेशला वगळण्याशी संबंधित केलेले ट्विट, का डिलीट केले? याबाबत आता ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि पाकिस्तानचे माजी मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पीकडून कारण सांगण्यात आले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 26, 2026 | 06:27 PM
T20 World Cup 2026: 'I was abused...' Why did Jason Gillespie delete 'that' tweet? He himself explained the reason...

T20 World Cup 2026: 'I was abused...' Why did Jason Gillespie delete 'that' tweet? He himself explained the reason...

Follow Us
Close
Follow Us:

Why did Jason Gillespie delete the tweet? ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि पाकिस्तानचे माजी मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी आता चांगलेच चर्चेत आले आहे. सोशल मीडिया पोस्टवरून ते वादात सापडले आहेत. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मधून बांगलादेशला वगळण्याशी संबंधित एका प्रकरणी ते वादात आले आहे. गिलेस्पीकडून या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ट्विट करण्यात आले होते, जे त्यांनी नंतर डिलीट देखील केले. आता, त्यांनी ट्विट डिलीट करण्यामागील कारण नेमके काय? याबाबत स्पष्टता दिली आहे.

ट्विट डिलीट करण्याचे कारण काय?

जेसन गिलेस्पी यांनी सांगितले की, ट्विट पोस्ट केल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अपमान आणि शिवीगाळ करण्यात आली. एका माजी वापरकर्त्याने त्यांना विचारणा केली की,  त्यांनी ट्विट का डिलीट केले, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की फक्त एक साधा प्रश्न विचारल्याबद्दल त्यांना शिवीगाळ करण्यात आली. म्हणूनच त्यांनी ट्विट डिलीट केले. काही जण गिलेस्पीच्या विधानाचा अर्थ भारतीय क्रिकेट चाहत्यांवरील आरोप म्हणून देखील लावताना दिसट आहेत.

हेही वाचा : बिहारने रणजी ट्रॉफी प्लेट ग्रुपच्या जेतेपदावर कोरले नाव! मणिपूरचा 568 धावांनी धुव्वा उडवून केली एलिट ग्रुपमध्ये दिमाखात एंट्री

गिलेस्पी यांचे ते ट्विट काय होते?

२०२६ च्या टी२० विश्वचषकातून आयसीसीकडून  बांगलादेशला डच्चू देण्यात आला आहे. या निर्णयानंतर गिलेस्पीने आयसीसीच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लिहिले की,  “आयसीसीने स्पष्ट केले असते का की बांगलादेश त्यांचे सामने भारताबाहेर का खेळू शकत नाही?” त्यांनी असे देखील निदर्शनास आणून दिले की भारताने यापूर्वी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास नकार दर्शवला होता. परंतु नंतर त्यांना पाकिस्तानबाहेर सामने खेळण्याची परवानगी मिळाली होती.  गिलेस्पीकडून विचारणा करण्यात आली की, या प्रकरणांमध्ये वेगवेगळे निकष लागू केले जात आहेत का?

बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला संधी

दोन दिवसांपूर्वी, आयसीसीकडून २०२६ च्या टी२० विश्वचषकातून बांगलादेश क्रिकेट संघाला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी स्कॉटलंडचा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा पुढील महिन्यात ७ फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात त्यांचे सामने खेळण्यास नकार दिला होता आणि त्यांचे सामने दुसऱ्या देशात हलवण्याची मागणी करण्यात आली होती.

हेही वाचा : IND vs NZ T-20 Series : श्रेयस अय्यरला लागली लॉटरी! संघातील स्थान राहणार कायम; तिलक वर्मा T20I मालिकेबाहेर

आयसीसीचे म्हनणे काय?

आयसीसीने बांगलादेशच्या मागणीला केराची टोपली दाखवली आणि स्पष्टपणे सांगितले की स्पर्धा सुरू होण्यास फक्त तीन आठवडे शिल्लक आहेत. लॉजिस्टिक आणि इतर व्यवस्थेमुळे इतक्या कमी वेळेत सामने दुसऱ्या देशात हलवणे शक्य होणार नाही. शिवाय, आयसीसीने भारतातील सुरक्षा परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय एजन्सीची नियुक्ती देखील केली, ज्याने बांगलादेश संघाला कोणताही धोका नसल्याची पुष्टी देखील केली. तरी देखील बांगलादेशच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आयसीसीने त्यांना स्पर्धेबाहेर करण्याचा निर्णय घेतला.

Web Title: T20 world cup 2026 jason gillespie himself explained the reason behind deleting the tweet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • bcci
  • IND VS BAN
  • IND VS PAK
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

T20 World Cup 2026 : ‘संघाची घोषणा ही स्पर्धेत सहभागी….’, पाकिस्तान टी-20 विश्वचषकात खेळण्याबाबत मोहसिन नक्वी यांचे विधान
1

T20 World Cup 2026 : ‘संघाची घोषणा ही स्पर्धेत सहभागी….’, पाकिस्तान टी-20 विश्वचषकात खेळण्याबाबत मोहसिन नक्वी यांचे विधान

T20 World Cup 2026 मधून बाहेर झाल्यानंतर बांगलादेशने आपल्या खेळाडूंसोबत केला विश्वासघात! नझमुल पुन्हा संघात पुनरागमन
2

T20 World Cup 2026 मधून बाहेर झाल्यानंतर बांगलादेशने आपल्या खेळाडूंसोबत केला विश्वासघात! नझमुल पुन्हा संघात पुनरागमन

IND vs NZ : तिलक वर्मा विश्वचषकासाठी तयार, यादिवशी करणार संघामध्ये पुनरागमन! कोणाचा होणार पत्ता कट?
3

IND vs NZ : तिलक वर्मा विश्वचषकासाठी तयार, यादिवशी करणार संघामध्ये पुनरागमन! कोणाचा होणार पत्ता कट?

क्रिकेट जगतावर शोककळा, BCCI चे माजी अध्यक्षांचे निधन! जय शाह यांनी व्यक्त केला शोक
4

क्रिकेट जगतावर शोककळा, BCCI चे माजी अध्यक्षांचे निधन! जय शाह यांनी व्यक्त केला शोक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.