Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bel vs Sen FIFA 2026: बेल्जियमचे ऐतिहासिक कमबॅक! 2-0 च्या पिछाडीवरून अखेरच्या क्षणी सेनेगलवर दणदणीत विजय

Belgium Beat Senegal In FIFA World Cup 2026 Round of 32: फिफा विश्वचषक 2026 च्या राउंड ऑफ 32 मध्ये बेल्जियमने 2-0 च्या पिछाडीवरून अविश्वसनीय कमबॅक करत अतिरिक्त वेळेच्या अखेरच्या क्षणी गोल करत सेनेगलवर 3-2 असा थरारक विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयासह बेल्जियमने राऊंड ऑफ 16 मध्ये धडक मारली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 02, 2026 | 01:41 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • बेल्जियमचा थरारक विजय
  • 2-0 च्या पिछाडीवरून ऐतिहासिक कमबॅक
  • अखेरच्या क्षणी सेनेगलचा पराभव
फिफा विश्वचषक २०२६ च्या (FIFA World Cup 2026) स्पर्धेतील राउंड ऑफ ३२ मध्ये बुधवारी (दि. १) एक असा सामना खेळला गेला, ज्याची गणना फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात रोमांचक आणि थरारक सामन्यांमध्ये केली जाईल. सामन्याच्या शेवटच्या मिनिटांपर्यंत दोन गोलने पिछाडीवर असूनही बेल्जियमने जोरदार कमबॅक केले. बेल्जियमने निर्धारित वेळेच्या शेवटच्या मिनिटांमध्ये दोन गोल करून सामना अतिरिक्त वेळेत नेला आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेच्या अगदी शेवटच्या सेकंदांमध्ये गोल करून सेनेगलला ३-२ ने पराभूत केले. या अविश्वसनीय विजयासह, बेल्जियमचा संघ स्पर्धेच्या ‘१६ संघांच्या फेरीत’ पोहोचला आहे.

ICC T20 Rankings मध्ये मोठा बदल,अभिषेक शर्माला मागे टाकत हा’ खेळाडू बनला जगातील नंबर-१ टी-20 फलंदाज

रोमेलू लुकाकूच्या गोलमुळे दमदार कमबॅक

बेल्जियमच्या ऐतिहासिक पुनरागमनाची सुरुवात बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या अनुभवी रोमेलू लुकाकूने ८६ व्या मिनिटाला एक शानदार गोल करून बेल्जियमला सामन्यात जिवंत ठेवले. ज्यानंतर युरी टिलेमन्सने युरी टिलेमन्सने गोल करून सामना २-२ असा बरोबरीत आणला आणि अतिरिक्त वेळेच्या शेवटच्या स्टॉपेज टाइममध्ये विश्वचषक इतिहासातील सर्वात उशिरा गोल करून आपल्या संघाला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला. फिफा विश्वचषकाच्या गेल्या ११ हंगामांच्या नॉकआउट इतिहासात, २ किंवा अधिक गोलांनी पिछाडीवर असूनही एखाद्या संघाने सामना जिंकण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. विशेष म्हणजे, बेल्जियमने यापूर्वी २०१८ च्या विश्वचषकात जपानविरुद्ध ही कामगिरी केली होती.

सेनेगलने घेतली २-० अशी भक्कम आघाडी

सामन्यात एका क्षणी सेनेगलचे पूर्णपणे वर्चस्व असल्याचे दिसत होते. २४ व्या मिनिटाला, हबीब दियाराने एक शानदार गोल करून सेनेगलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर, ५१ व्या मिनिटाला, इस्माईला सारने या विश्वचषकातील एक गोल केला. त्याने मौसा नियाखाटेकडून आलेला लांब पास छातीने नियंत्रित केला आणि बेल्जियमचा गोलकीपर थिबॉ कोर्तुआला चकवून चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला. २-० ने पिछाडीवर असताना, बेल्जियमच्या प्रशिक्षकाने ५६ व्या मिनिटाला केविन डी ब्रुयन आणि जेरेमी डोकू या स्टार खेळाडूंना बाहेर काढून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यानंतर गोलकीपर कोर्तुआने तीन शानदार डिफेन्स करून सेनेगलला आघाडी घेण्यापासून रोखले आणि बेल्जियमच्या आशा जिवंत ठेवल्या.

विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा अखेरच्या क्षणी केलेला गोल

अतिरिक्त वेळेत दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत असताना आणि सामना पेनल्टी शूटआऊटकडे जाईल असे वाटले. शेवटच्या काही सेकंदांमध्ये बॉक्सच्या आत एका बेल्जियन खेळाडूवर फाऊल झाला. व्हिडिओ रिव्ह्यू (VAR) नंतर, पंचांनी बेल्जियमच्या बाजूने पेनल्टी दिली. सेनेगलच्या खेळाडूंनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला. पेनल्टीच्या निर्णयामुळे सेनेगलचे खेळाडू इतके नाराज झाले होते की, बचावपटू पाथे सिसे निषेध म्हणून पेनल्टी स्पॉटवर आडवा झाला, ज्याला नंतर बाहेर काढण्यात आले. परंतु, अतिरिक्त वेळेच्या १२५ व्या मिनिटाला, युरी टिलेमन्सने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करून बेल्जियमला ​​३-२ असा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. फिफा विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात लांब अंतरावरून झालेला गोल आहे. बेल्जियम आता सोमवारी सिएटलमध्ये होणाऱ्या राऊंड ऑफ १६ मध्ये अमेरिका (USA) किंवा बोस्निया-हर्झेगोविना यांच्यापैकी एकाचा सामना करेल.

KCA lifts ban: आधी बिनशर्त माफी, मग बॅन हटवला! स्पॉट-फिक्सिंगनंतर ‘हा’ भारतीय गोलंदाज कमबॅक करणार? क्रिकेट असोसिएशनचा मोठा निर्णय

Web Title: Belgium beat senegal historic comeback 3 2 win fifa world cup 2026 round of 16

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Fifa
  • Fifa World Cup
  • Football Tournament
  • Senegal

संबंधित बातम्या

Lionel Messi चा फुटबॉलमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक; नेमकं कारण काय? मैदानावर कधी परतणार?
1

Lionel Messi चा फुटबॉलमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक; नेमकं कारण काय? मैदानावर कधी परतणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.