Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhuvneshwar Kumar चे दमदार कमबॅक! Hong Kong Sixes 2026 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार; ‘या’ स्टार खेळाडूंनाही संधी

Bhuvneshwar Kumar captain For Hong kong Sixes 2026: हाँगकाँग सिक्सर्स २०२६ साठी भारतीय संघ संघ जाहीर करण्यात आला आहे. या अनोख्या स्पर्धेसाठी भुवनेश्वर कुमारला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 05, 2026 | 05:43 PM
Bhuvneshwar Kumar captain For Hong kong Sixes

Bhuvneshwar Kumar captain For Hong kong Sixes

Follow Us
Follow Us:
  • भुवनेश्वर कुमारच्या हाती टीम इंडियाची कमान
  • हाँगकाँग सिक्सेससाठी संघाची घोषणा
  • ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
भारतीय संघाचा स्विंगचा बादशाह भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) बऱ्याच काळापासून संघाबाहेर आहे. दरम्यान, भुवनेश्वरबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. हाँगकाँग सिक्सेस २०२६ स्पर्धेसाठी भुवनेश्वर कुमारची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भुवनेश्वरच्या नेतृत्वाखाली भारत ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होईल. कृणाल पांड्या आणि नितीश राणा यांसारख्या आयपीएलच्या मोठ्या खेळाडूंना ७ सदस्यीय भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

IND vs WI: मालिका संपताच भारत-वेस्ट इंडिजला मोठा झटका; दोन्ही संघांना ICC चा दणका; नेमकं कारण काय?

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेचे स्वरुप

हाँगकाँग सिक्सेसची पहिली आवृत्ती १९९२ मध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात सहा षटकांचे सामने असतात आणि प्रत्येक संघात सहा खेळाडू असतात. गोलंदाज आणि विकेटकीपरव्यतिरिक्त, मैदानावर चार क्षेत्ररक्षक असतात. या स्पर्धेत विकेटकीपर वगळता प्रत्येक खेळाडूला एक षटक टाकणे बंधनकारक आहे. फक्त एक गोलंदाजच दोन षटके टाकू शकतो. प्रत्येक संघाला विजयासाठी दोन गुण मिळतात. याचे नियम नेहमीच्या क्रिकेट सामन्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत.

ही स्पर्धा २०१७ पर्यंत सातत्याने आयोजित केली जात होती, त्यानंतर ती बंद करण्यात आली. हाँगकाँग सिक्सेस २०२४ मध्ये पुन्हा सुरू झाली. ही प्रमुख स्पर्धा ३० ऑक्टोबर रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सर्व सामने सकाळी ५:४५ वाजता सुरू होतील.

हाँगकाँग सिक्सेस २०२६ मध्ये १२ संघ सहभागी

हाँगकाँग सिक्सेस २०२६ स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी होतील, ज्यांची चार वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. भारतीय संघ ‘क’ गटात आहे, ज्यामध्ये पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांचाही समावेश आहे. सर्व सामने टिन क्वाँग रोड रिक्रिएशन ग्राउंडवर खेळले जातील.

  • गट अ: ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग आणि इंग्लंड
  • गट ब: बांगलादेश, स्कॉटलंड आणि श्रीलंका
  • गट क: भारत आणि संयुक्त अरब अमिराती
  • गट ड: दक्षिण आफ्रिका, ओमान आणि अफगाणिस्तान
  • हाँगकाँग सिक्सेस २०२६ साठी भारताचा संघ
हाँगकाँग क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटने २०२६ हंगामासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पांड्या यांच्या समावेशामुळे भारतीय संघ मजबूत दिसत आहे. या संघात शशांक सिंग, टी नटराजन आणि नितीश राणा यांसारख्या प्रमुख आयपीएल स्टार्सचाही समावेश आहे.

 

ही स्पर्धा भुवनेश्वर कुमारसाठी विशेष महत्त्वाची आहे. तो बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर आहे. त्याने शेवटचा नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी खेळला होता. त्याने २०२६ च्या आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. यानंतर, त्याच्या भारतीय व्हाईट-बॉल संघात पुनरागमनाची मागणी होऊ लागली होती, परंतु आतापर्यंत त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. भुवनेश्वरसोबत कृणाल पांड्या देखील हाँगकाँग सिक्सर्समधील भारताच्या मोहिमेचा भाग असेल. दोघेही आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळतात.

टीम इंडियाचा संघ: भुवनेश्वर कुमार (क), कृणाल पंड्या, नितीश राणा, शशांक सिंग, टी नटराजन, राहुल त्रिपाठी आणि राहुल तेवतिया.

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी

Web Title: Bhuvneshwar kumar captain hong kong sixes 2026 team india squad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • Bhuvneshwar Kumar
  • krunal pandya

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.