PAK vs BAN: Big blow to Pakistan cricket team! 'This' bowler injured before series against Bangladesh
PAK vs BAN : पाकिस्तान क्रिकेट संघ बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिका खेळण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत, आता संघातील सर्व खेळाडू त्यांच्या योग्य कामगिरीसाठी कठोर परिश्रम करताना दिसून येत आहेत. परंतु, या मालिकेपूर्वी पाकिस्तान संघासाठी खूप वाईट बातमी समोर आली आहे. पाकिस्तान संघाचा एक महत्त्वाचा गोलंदाज जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानचा हरिस रौफबाबत दुखपतीची बातमी आहे. अशा परिस्थितीत, तो जुलै महिन्यापासून सुरू होणाऱ्या बांगलादेश मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. सध्या, हरिस रौफ मेजर क्रिकेट लीग मधून बाहेर आहे.
स्टार पाकिस्तानी गोलंदाज हरिस रौफ अमेरिकेत मेजर क्रिकेट लीग २०२५ मध्ये खेळत आहे. तो लीगमध्ये सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न संघाचा एक भाग आहे. यादरम्यान रौफला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. मेजर क्रिकेट लीगचे अजून देखील काही सामने बाकी आहेत. यापूर्वी फ्रान्सिस्को युनिकॉर्न संघाला रौफच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. आता तो एमएलसीचे उर्वरित सामन्यात खेळताना दिसणार नाही.
हॅरिस रौफ हा ४ जुलै रोजी टेक्सास सुपर किंग्जविरुद्ध खेळत होता. या सामन्यात दुखापतीमुळे त्याने फक्त एकच षटक टाकले होते. त्याच्या जागी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज बेन लिस्टरला संघात जागा देण्यात आली आहे. याबद्दल अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे.
फ्रान्सिस्को युनिकॉर्न संघापेक्षा पाकिस्तानला हॅरिस रौफच्या दुखापतीची जास्त चिंता जाणवू लागली आहे. मेजर क्रिकेट लीग २०२५ आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी क्रिकेट संघ या महिन्यापासून बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. या दरम्यान, पाकिस्तानी संघ बांगलादेशचा दौरा करणार आहे, जिथे दोघांमध्ये ३ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे.
अशा परिस्थितीत, हॅरिस रौफची दुखापत पाकिस्तानी संघासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. बांगलादेश मालिकेसाठी पाकिस्तानकडून अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही. रौफ या मालिकेत खेळणार नाही अशी शक्यता आहे. जो संघासाठी मोठा धक्का असणार आहे.