आरसीबीचा वेगवान गोलंदाज यश दयालच्या अडचणी अवढताना दिसत आहेत. कारण आता पोलिसांकडून त्याच्याविरुद्ध कलम ६९ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्याच्यावर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. जर या प्रकरणात यश दयाल दोषी आढळला तर त्याला दहा वर्षांची शिक्षा देखील होण्याची शक्यता आहे. तसे पाहता यश दयाल हा लैंगिक शोषणाचा आरोप झालेलापहिला क्रिकेटपटू नाही. त्याच्या आधी देखील अनेक क्रिकेटपटूंची नावे अशा प्रकरणांत आली आहेत. यामध्ये २ विश्वविजेत्या खेळाडूंचा देखील समावेश आहे. याबद्दल आपण माहिती घेणार आहेत.(फोटो-सोशल मीडिया)
Photo:..so rape is done; Not only Yash Dayal but also 'these' 6 players in the cricket world have been named in sexual abuse cases..
रुबेल हुसेन - बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसेनवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला गेला आहे. २०१५ मध्ये एका बांगलादेशी अभिनेत्रीकडून त्याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. नंतर त्या अभिनेत्रीने बलात्काराचा खटला मागे घेतला होता, त्यानंतर त्याला विश्वचषकात खेळण्यास मिळाले होते.
अर्जुन रणतुंगा - १९९६ मध्ये श्रीलंकेला विश्वचषक जिंकवून देण्यात मोठा वाटा असणारा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगावर २०१८ मध्ये एका हॉटेलमध्ये विनयभंगाचा आरोप करण्यात आला होता.
लसिथ मलिंगा - श्रीलंकेचा 'यॉर्कर किंग' माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचे नाव देखील लैंगिक छळाच्या प्रकरणात आले होते. एका महिलेकडून सोशल मीडियावर त्याच्यावर हा घृणास्पद आरोप करण्यात आला होता. परंतु, त्याच्याविरुद्ध या प्रकरणी कोणताही औपचारिक खटला दाखल करण्यात आला नव्हता.
मकाया एनटिनी - दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज असणारा मकाया एनटिनीवर एका घरगुती महिला कर्मचाऱ्याने बलात्काराचा आरोप केला होता. त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते, परंतु नंतर अपीलात त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
ल्यूक पोमर्सबाख - माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि आरसीबी खेळाडू ल्यूक पोमर्सबाखही आयपीएल दरम्यान विनयभंग आणि हिंसाचाराच्या प्रकरणात अडकला होता. या प्रकरणातही तक्रार करणाऱ्या मुलीकडून नंतर सर्व आरोप मागे घेण्यात आले होते.
अमित मिश्रा - २०१५ मध्ये टीम इंडियाचा माजी फिरकीपटू अमित मिश्राचे नाव सुद्धा लैंगिक छळाच्या प्रकरणात आले होते. हा खटला बंगळुरूमध्ये दाखल करण्यात आला होता. परंतु नंतर हा खटला मागे घेण्यात आला होता.