Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Ranking मध्ये मोठा उलटफेर! विश्वचषक जिंकूनही स्मृती मानधनाला मोठा झटका; लॉरा वोल्वार्ड्ट अव्वल स्थानी 

आयसीसीकडून ताजी एकदिवसीय क्रमवारीत जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत भारतीय स्टार फलंदाज स्मृती मानधनाला एका स्थानाचा फटका बसला आहे. ती दुसऱ्या स्थानी घसरली असून वोल्वार्ड्टने पहिल्या स्थानी आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 04, 2025 | 08:16 PM
Big upheaval in ICC Rankings! Smriti Mandhana suffers a big setback despite winning the World Cup; Laura Wolvaardt tops the list

Big upheaval in ICC Rankings! Smriti Mandhana suffers a big setback despite winning the World Cup; Laura Wolvaardt tops the list

Follow Us
Close
Follow Us:

Latest ICC Rankings announced : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये  भारतीय संघाने आपली प्रभावी कामगिरी दाखवत विजय मिळवला. परंतु, भारतीय स्टार फलंदाज स्मृती मानधनाला मोठा झटका बसला आहे. ताज्या आयसीसी क्रमवारीत मोठा उलटफेर झाला असून दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टने मानधनाला मागे टाकत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. मानधना आता दुसऱ्या स्थानावर घसरली असून तर अ‍ॅशले गार्डनर तिसऱ्या स्थानावर विराजमान झाली आहे.

वोल्वार्ड्टची शानदार कामगिरी

विश्वचषकामध्ये लॉरा वोल्वार्ड्टने शानदार फलंदाजी केली  आहे. तिने विश्वचषकाच्या उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात शतके झळकावली आहे. तिच्या दमदार कामगिरीचा थेट परिणाम रँकिंगवर दिसून आला. तीला दोन स्थानांचा फायदा होऊन तिने पहिल्यांदाच एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, स्मृती मानधना उपात्य  आणि अंतिम सामन्यात अपयशी ठरली आणि तिचे नंबर १ स्थान तीला गमवावे लागले.

हेही वाचा : Women’s ODI World Cup : पॉवर-हिटर आणि फिरकीपटूंचा विश्वचषकात डंका! झेल पकडण्याचा टक्का घसरला, तर DRS नेही केली निराशा….

भारतीय फलंदाज महिलांच्या क्रमवारीत सुधारणा

जरी मानधनाच्या क्रमवारीत घसरण झाली असली तरी, उर्वरित भारतीय खेळाडूंसाठी ही क्रमवारी फायद्याची ठरली आहे. उपांत्य फेरीत शानदार शतक झळकावणारी जेमिमा रॉड्रिग्ज नऊ स्थानांनी पुढे सरकून पहिल्यांदाच टॉप १० मध्ये प्रवेश मिळवला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने देखील चार स्थानांनी प्रगती साधत १४ व्या स्थानावर विराजमान झाली आहे.  तसेच अष्टपैलू दीप्ती शर्माने तीन स्थानांनी प्रगती करत ती आता २१ व्या स्थानावर पोहचली आहे. युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोषने देखील  तिच्या क्रमवारीत सुधारणा  केली असून तिने चार स्थानांनी प्रगती साधली असून ती ३० व्या स्थानावर पोहचली आहे.

ऑलराउंडर आणि गोलंदाजांच्या क्रमवारीत देखील बदल

अंतिम फेरीत आपल्या अष्टपैलू कामगिरीने प्रभावित करणाऱ्या दीप्ती शर्माने अष्टपैलूच्या क्रमवारीत एका स्थानाने प्रगती केली आहे आणि आता ती चौथ्या स्थानावर आहे. टॉप २० मध्ये दीप्ती ही एकमेव भारतीय ऑलराउंडर विराजमान आहे. गोलंदाजीच्या क्रमवारीत देखील तिची कामगिरी स्थिर राहिली आहे. ती पाचव्या स्थानावर असून इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन गोलंदाजीमध्ये आपले वर्चस्व कायम राखले आहे. तिने  स्थान कायम ठेवले आहे. दरम्यान, भारताची उदयोन्मुख गोलंदाज श्री चरणी सात स्थानांची झेप घेत. २३ व्या स्थान पटकावले आहे.

हेही वाचा : Women’s ODI World Cup : भारतात विश्वचषक विजयाचा जल्लोष, पाकिस्तानमध्ये तर PCB ने प्रशिक्षकावर उगारला राग; घेतला मोठा निर्णय

भारतीय संघाच्या यशानंतरही रँकिंगमध्ये पडझड

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ जिंकून भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. असे असले तरी, वैयक्तिक रँकिंगमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. स्मृती मानधना अव्वल स्थानावरून घसरली असली तरी, भारतीय खेळाडूंच्या सामूहिक कामगिरीने जागतिक क्रिकेटमध्ये देशाचे स्थान अधिक बळकट केले आहे.

Web Title: Big change in icc rankings laura wolvaardt overtakes smriti mandhana to top spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 08:16 PM

Topics:  

  • ICC Ranking
  • Laura Wolvaardt
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

Women’s ODI World Cup : राज्य सरकारकडून स्मृती, जेमिमा आणि राधा यादव यांचा गौरव होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा 
1

Women’s ODI World Cup : राज्य सरकारकडून स्मृती, जेमिमा आणि राधा यादव यांचा गौरव होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा 

चॅम्पियन संघ…चॅम्पियन खेळाडूंनी खास अंदाजात घालवली रात्र! सोशल मिडियावर शेअर केले काही खास Photo
2

चॅम्पियन संघ…चॅम्पियन खेळाडूंनी खास अंदाजात घालवली रात्र! सोशल मिडियावर शेअर केले काही खास Photo

महिला विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी BCCI ने उघडली तिजोरी! ICC पेक्षा जास्त बक्षीस रक्कम केली जाहीर
3

महिला विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी BCCI ने उघडली तिजोरी! ICC पेक्षा जास्त बक्षीस रक्कम केली जाहीर

IND W vs SA W : 308 धावा, 1 शतक आणि अर्धशतक… विश्वचषकाचा तो सामना ठरला खलनायक! प्रतीकाने व्हीलचेअरवर बसून साजरा केला विजय
4

IND W vs SA W : 308 धावा, 1 शतक आणि अर्धशतक… विश्वचषकाचा तो सामना ठरला खलनायक! प्रतीकाने व्हीलचेअरवर बसून साजरा केला विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.