फोटो सौजन्य - Cricket Australia सोशल मीडिया
पॅट कमिन्स सोशल मीडिया पोस्ट : ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली दोन सामान्यांची कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला रवाना होणार आहे. पण त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियन संघामधील अनेक मजबूत खेळाडू दुखापतीमुळे चॅम्पियन ट्रॉफीच्या बाहेर झाले आहेत. यामध्ये त्यांचा कर्णधार पॅट कमिन्सचे नाव देखील या यादीमध्ये सामील आहे. तर आता पॅट कमिन्सने त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे, परंतु यादरम्यान त्याला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. पॅट कमिन्स दुसऱ्यांदा वडील झाला आहे. ज्याची माहिती त्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे. पॅट कमिन्स आणि त्याची पत्नी बेकी दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. त्यांची पत्नी बेकी हिने एका मुलीला जन्म दिला आहे. यामुळे पॅट कमिन्सने श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून विश्रांती घेतली होती. आता कमिन्स आणि बेकी यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांसोबत हा सर्वात मोठा आनंद शेअर केला आहे.
Pat Cummins & his wife blessed with a baby Girl – Edi 🤍
– Congratulations to both of them. pic.twitter.com/ET7UqHja4k
— Johns. (@CricCrazyJohns) February 8, 2025
टीम इंडियासोबत खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटी सामन्यादरम्यान पॅट कमिन्सला दुखापत झाली होती. कमिन्सला घोट्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून बाहेर पडला आहे. कमिन्सला चॅम्पियन्स ट्रॉफीमधून वगळणे हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का आहे. आता ऑस्ट्रेलिया या स्पर्धेसाठी नवीन कर्णधाराच्या शोधात आहे, ज्यामध्ये ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथची नावे समोर येत आहेत.
यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा ताण खूप वाढला आहे. संघातील अनेक बलाढ्य खेळाडू दुखापतींमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडले आहेत. ज्यामध्ये वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि अष्टपैलू मिचेल मार्श यांची नावे देखील आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान हेझलवूडला पायाच्या दुखापतीचा त्रास झाला. आता ऑस्ट्रेलियाला संघात अनेक मोठे बदल करावे लागतील.
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे यामध्ये पहिल्या दिनी श्रीलंकेच्या संघाने पहिल्या डावात २५७ धावा केल्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या फलंदाजी करत आहे. पहिल्या दिनाचा खेळ झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३ विकेट्स गमावून ३३० धावा केल्या आहेत. या धावसंख्येसह ऑस्ट्रेलियाच्या संघाने ७३ धावांची आघाडी घेतली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी या दोघांनी शतक ठोकून अजूनही मैदानावर नाबाद आहेत.