बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला (Commonwealth Games 2022) सुरुवात झाली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर आज पहिल्या दिवशी शुक्रवारी सामने सुरू होतील. स्विमिंग, ट्रॅक सायकलिंग, ट्रायथलॉन, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, बॉक्सिंग, महिला क्रिकेट, हॉकी, लॉन बॉल, टेबल टेनिस, नेटबॉल, स्क्वॉश या खेळांचे लीग सामने खेळवले जाणार आहेत.
11 दिवस चालणाऱ्या या खेळांमध्ये 72 देशांतील 5 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत असून, यामध्ये 20 खेळांमध्ये 280 स्पर्धा होणार आहेत. भारताचा 213 सदस्यीय संघ सहभागी होणार आहे. 8 ऑगस्टपर्यंत पार पडणाऱ्या स्पर्धेत भारताचे 108 पुरुष आणि 107 महिला खेळाडू विविध अशा 15 खेळांमध्ये सहभागी होतील.
लॉन बोल्स (Lawn Bowls)
पुरुष दुहेरी पहिली फेरी – दुपारी 1 वाजता – सुनील बहादुर, मिर्दूल बोर्गोहेन
पुरुष तिहेरी – दुपारी 1 वाजता – दिनेश कुमार, नवनीत सिंह, चंदन सिंह
महिला एकेरी – दुपारी 1 वाजता – नयनमोनी सायकिया
महिला चार – दुपारी 1 वाजता – रुपा तिरके, तानिया चौधरी, लवली चौधरी, पिंकी/नयनमोनी सायकिया
टेबल टेनिस (Table Tennis)
पुरुष संघ पात्रता फेरी 1 – दुपारी 2 वाजता- हरमीत देसाई, सनिल शेट्टी, अचंता शरथ कमल, जी. साथियान
महिला संघ पात्रता फेरी 1 – दुपारी 2 वाजता- दिया चितळे, मनिका बात्रा, रीत टेनिसन, श्रीजा अकुला
स्विमिंग (Swimming)
400m फ्रिस्टाईल हीट्स- दुपारी 3 वाजता – कुशग्रा रावत
100m बॅकस्ट्रोक – दुपारी 3 वाजता – श्रीहरी नटराजा
50m बटरफ्लाय हीट्स – दुपारी 3 वाजता – साजन प्रकाश
100m बॅकस्ट्रोक S9 हीट्स – दुपारी 3 वाजता – आशिष कुमार
क्रिकेट (महिला टी20)
ग्रुप A स्टेज मॅच- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुपारी 4.30 वाजता
ट्रायथलॉन (Triathlon)
पुरुष फायनल – आदर्श एमएस, विश्वनाथ यादव – दुपारी 3:30 वाजता
महिला फायनल – संजना जोशी, प्रग्या मोहन – दुपारी 3:30 वाजता
बॉक्सिंग (Boxing)
पुरुष 63.5 kg – राऊंड ऑफ 32 – दुपारी 4:30 वाजता – शिवा थापा
पुरुष 67 kg – राऊंड ऑफ 32 – रात्री 11 वाजता – रोहित टोकस
पुरुष 75 kg राऊंड ऑफ 32 – दुपारी 4:30 वाजता – सुमित कुंडू
पुरुष 80 kg – राऊंड ऑफ 32 – रात्री 11 वाजता – आशिष कुमार
बॅडमिंटन (Badminton)
मिश्र संघ (ग्रुप स्टेज) – भारत विरुद्ध पाकिस्तान – सायंकाळी 6.30 वाजता
हॉकी (Hockey)
महिला (ग्रुप स्टेज) – भारत विरुद्ध घाना – सायंकाळी 6.30 वाजता
स्कॉश (Squash)
महिला एकेरी – अनाहता सिंह (रात्री 11 वाजता)
पुरुष एकेरी – अभय सिंह – (रात्री 11.45 वाजता)