बर्लिंगहम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) 9 व्या दिवशी देखील भारतीय खेळाडू चांगलेच फॉरमॅट असलेले पहायला मिळाले. महिलांच्या ५७- ६० किलो वजनाच्या लाइटवेट बॉक्सिंग (Boxing) प्रकारात जॅस्मीनने भारतासाठी आणखीन एका पदकाची कमाई केली आहे. मात्र जॅस्मिनला उपांत्य फेरीत पराभवाची चव चाखायला लागली असून तिला कांस्यपदकावर (bronze medal) समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रकुल २०२२ मधील भारताचे हे ३० वे पदक आहे.
सेमीफायनलच्या सामन्यात जॅस्मिनला (Jasmin) इंग्लंडच्या जेमा रिचर्डसनने ३-२ च्या फरकाने मात दिली. महिलांच्या ५७ ते ६० किलो वजनी गटातील हा सामना अत्यंत चुरशी पाहिला मिळाला. अटीतटीच्या या सामन्यात केवळ एका गुणाच्या फरकाने जॅस्मिनचा पराभव झाला. त्यामुळे भारताला बॉक्सिंगमध्ये जॅस्मिनला कांस्य पदक मिळालं आहे.जॅस्मीन आणि जेमा या दोघींनी एकमेकिंविरुद्ध तगडं आव्हान सादर केले आहे. पण अटीतटीच्या सामन्यात केवळ एका गुणाच्या फरकाने जेमा विजयी होत फायनलमध्ये पोहोचली आहे.
अमित-नीतूचं पदक निश्चित :
जॅस्मिन पराभूत झाली असली तरी भारताचा अनुभवी बॉक्सर अमित पांघलने (Amit Panghal) पुरुषांच्या फ्लाईवेट कॅटेगरीत ४८ ते ५१ किलो वजनी गटात सेमीफायनलचा सामना जिंकत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. त्याने जॉम्बियाचा बॉक्सर पॅट्रिक चिनयेम्बा याला ५-० च्या फरकाने मात देत अंतिम फेरीत झेप घेतली आहे. ज्यामुळे भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. पुरुषांसह महिलांच्या ४५ ते ४८ किलो वजनी गटात भारताच्या नीतू घंघासने (Neetu Ghanghas) कॅनडाच्या प्रियांका ढिल्लोंला मात देत फायनलमध्ये एन्ट्री मिळवली आहे. त्यामुळे त्याठिकाणी देखील भारताचं किमान रौप्य पदक निश्चित झालं आहे.