Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्जुन बनू शकतो मोठा वेगवान गोलंदाज, ब्रेट लीने व्यक्त केले भाकीत

  • By युवराज भगत
Updated On: Apr 25, 2023 | 08:15 PM
अर्जुन बनू शकतो मोठा वेगवान गोलंदाज, ब्रेट लीने व्यक्त केले भाकीत
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने अलीकडेच इंडियन प्रीमियर लीग कारकिर्दीला सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्स वेगवान गोलंदाजी अष्टपैलू अर्जुनने आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २ विकेट्स घेतल्या आहेत. अर्जुनने डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करण्यापासून आपला ठसा उमटवला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली अर्जुनच्या कामगिरीने खूप प्रभावित झाला आहे. अर्जुन वेगाचा व्यापारी बनू शकतो आणि तो १४० किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो, असा त्याचा विश्वास आहे.

माध्यमांकडून जेव्हा ब्रेट लीला विचारण्यात आले की, मुंबईमध्ये खेळताना त्याने कोणत्या बॉलिंग स्पेलमध्ये गोलंदाजी करणे योग्य असेल? कारण त्याची सुरुवातीची फेज आहे. त्यावर तो म्हणाला, मला वाटते की तो सर्व स्पेलमध्ये गोलंदाजी करू शकतो. तो पुढे म्हणाला, मी अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीने खूप प्रभावित झालो आहे. मला वाटते की तो मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी करताना जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याची नवीन चेंडूवर गोलंदाजी उत्कृष्ट होत आहे. तो चेंडू अप्रतिम स्विंग करत आहे. अर्जुन मधल्या षटकांसाठी अनुकूल असून जसजसा तो अनुभवी होईल तसतसे अधिक चांगली गोलंदाजी करेल. त्याची डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी वाखाणण्याजोगी आहे.”

आयपीएलमधील तीनही सामन्यांदरम्यान अर्जुन सोशल मीडियावर चर्चेत राहिला. पण सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याचा वेग १०७.२ किमी प्रतितास दिसला आणि चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा स्थितीत त्यांच्यावर जोरदार टीका झाली. यावर ब्रेट लीने अर्जुनला सचिनच्या कारकिर्दीतून शिकण्याचा सल्ला दिला आहे, निंदा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. ब्रेट ली म्हणाला, “लोक जवळजवळ प्रत्येक गोष्टीवर टीका करतात. जर तुम्ही संदीप शर्माला पाहिले तर तो १२० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत आहे. अर्जुन किमान त्याच्यापेक्षा अधिक वेगवान गोलंदाजी करतो. तो फक्त २३ वर्षांचा आहे आणि त्याच्या पुढे संपूर्ण कारकीर्द पडली आहे.”

ब्रेट ली म्हणाला, “माझा अर्जुनला सल्ला आहे की टीकाकारांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नको. वडिलांच्या कारकिर्दीतून शिक. सचिनला देखील अशा चढउतारातून जावे लागते. अर्जुलकडे अप्रतिम कौशल्य असून तो १४० किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो. स्टेडियममधील मोठे दिवे आणि अधिक प्रेक्षकांसमोर खेळण्याची ज्यावेळी त्याला सवय होईल त्यावेळी त्याचा आणखी वेग वाढेल.”

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज पुढे म्हणाला, मला त्याच्या वेगात कोणतीही अडचण दिसत नाही. तो किती वेगवान गोलंदाजी करू शकतो हे मला माहीत आहे. त्याच्याकडे प्रतिभा आणि इतर सर्व काही गोष्टी आहेत. त्यामुळे अर्जुन जे करत आहे ते करत राहा असा माझा सल्ला असेल. जे लोक तुला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे ऐकू नको. लक्षात ठेवा की सोशल मीडियावर टीका करणार्‍या बहुतेक लोकांनी त्यांच्या आयुष्यात एकही चेंडू टाकलेला नाही. ते फक्त कीबोर्ड योद्धे आहेत.

Web Title: Brett lee predicts arjun can become a big fast bowler

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2023 | 08:15 PM

Topics:  

  • Arjun Tendulkar
  • mumbai indians

संबंधित बातम्या

Sania Chandok Photos : अर्जुन तेंडुलकर आणि सानियाचा प्रेमविवाह की अरेंज्ड मॅरेज? जाणून घ्या माहिती..
1

Sania Chandok Photos : अर्जुन तेंडुलकर आणि सानियाचा प्रेमविवाह की अरेंज्ड मॅरेज? जाणून घ्या माहिती..

सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच सनई चौघड्यांचा घुमणार आवाज, अर्जुन तेंडुलकरचा ‘गुपचूप’ उरकला साखरपुडा
2

सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच सनई चौघड्यांचा घुमणार आवाज, अर्जुन तेंडुलकरचा ‘गुपचूप’ उरकला साखरपुडा

Mumbai T20 League : सूर्याचे कर्णधारपद मुंबई टी-२० मध्ये फ्लॉप; मिस्टर ३६० चा संघ लीगमधून बाहेर.. 
3

Mumbai T20 League : सूर्याचे कर्णधारपद मुंबई टी-२० मध्ये फ्लॉप; मिस्टर ३६० चा संघ लीगमधून बाहेर.. 

IPL 2025 मध्ये पराभूत होऊनही मुंबई इंडीयन्स होणार मालामाल! इतके कोटी मिळणार संघाला
4

IPL 2025 मध्ये पराभूत होऊनही मुंबई इंडीयन्स होणार मालामाल! इतके कोटी मिळणार संघाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.