ICC Test रॅंकींगमध्ये जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावर, वर्षाच्या सुरुवातीलाच रचला मोठा इतिहास, ICC Awards मध्येसुद्धा झालेय नामांकन
ICC Test Rankings : भारताचा दिग्गज गोलंदाज तथा स्विंग मास्टर जसप्रीत बुमराह ICC टेस्ट रॅंकींगमध्ये अव्वल स्थानावर आला आहे. बुमराहने वर्षाच्या पहिल्याच दिवशीच आपल्या नावावर मोठा विक्रम करीत इतिहास रचला आहे. बुमराहने अलीकडेच मेलबर्न कसोटीत 9 विकेट्स घेतल्या होत्या. या दमदार कामगिरीमुळे त्याला क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा कसोटी गोलंदाज म्हणून आपली आघाडी मजबूत करण्यात मदत झाली आहे. जसप्रीत बुमराहचे आता ९०७ रेटिंग गुण आहेत. यासह तो ICC क्रमवारीच्या इतिहासातील सर्वोच्च क्रमांकाचा भारतीय कसोटी गोलंदाज बनला आहे. याआधी भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला कसोटी क्रमवारीत इतके रेटिंग गुण मिळवता आले नाहीत.
जसप्रीत बुमराहने या वर्षात रचले अनेक विक्रम
या अगोदरच ICC ने भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची २०२४ सालातील ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’साठी नामांकन केले आहे. या वर्षी बुमराह कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. ICC Awards च्या शर्यतीत आणखी 4 भारतीय आहेत, यामध्येसुद्धा बुमराहचे नाव सामील आहे.
टेस्ट रॅंकींगमधील टॉप टेन
जसप्रीत बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी करीत सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने आता ICC रॅंकींगमध्ये कागिसो रबाडा, जोश हेझलवूनड पॅट कमिन्स या गोलंदाजांना मागे टाकत 1 नंबर गाठला आहे. जसप्रीत बुमराहने त्याच्या जादुई गोलंदाजीने नेहमीच प्रतिस्पर्धी संघाला जेरीस आणले आहे. आयसीसी टेस्ट रॅंकींगमध्ये टॉप टेन मध्ये 3 भारतीय गोलंदाज आहेत. यामध्ये मॅट हेन्री, नेथन लायन, प्रभात जयसूर्या, नोमन अली आणि 10 व्या क्रमांकावर रवींद्र जडेजा आहे.
2024 बुमराहसाठी संस्मरणीय ठरले
जसप्रीत बुमराहसाठी २०२४ हे वर्ष खूप संस्मरणीय ठरले. त्याने 21 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 13.76 च्या सरासरीने 86 बळी घेतले. ज्यामध्ये त्याने पाच वेळा 5 विकेट घेण्याचा पराक्रमही केला. त्याचवेळी त्याने 13 कसोटी सामन्यात 71 विकेट घेतल्या. दुसरीकडे, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये त्याने आतापर्यंत 4 सामन्यात 30 विकेट घेतल्या आहेत. या यादीत अन्य कोणताही गोलंदाज बुमराहच्या जवळ नाही.
ICC क्रमवारीत आर अश्विन बनला होता सर्वोच्च गोलंदाज
जसप्रीत बुमराहच्या आधी आर अश्विन हा ICC क्रमवारीच्या इतिहासातील सर्वोच्च क्रमांकाचा भारतीय कसोटी गोलंदाज होता. बुमराहने शेवटच्या रँकिंगमध्ये त्याची बरोबरी केली होती आणि यावेळी त्याला पराभूत करण्यात तो यशस्वी ठरला. अश्विनने डिसेंबर 2016 मध्ये 904 रेटिंग पॉइंट्सचा आकडा गाठला होता. त्याच वेळी, जगातील सर्व गोलंदाजांच्या सर्वोत्तम रेटिंगच्या यादीत, तो इंग्लंडच्या डेरेक अंडरवुडसह संयुक्तपणे 17 व्या स्थानावर आला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर मालिका सुरु आहे. यामध्ये भारताचा स्टार जसप्रीत बुमराहने २०२४ मध्ये कमालीची कामगिरी संघासाठी केली आहे. त्याने झालेल्या T२० विश्वचषकामध्ये त्याचबरोबर सुरु असेलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेमध्ये सुद्धा त्याने अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली आहे. बुमराहने या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
आयसीसी अॅवार्डमध्ये नामांकन
४ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकन खेळाडूंची नावे सांगितली आहेत. ज्यामध्ये भारताचा एक, इंग्लंडचा २ आणि श्रीलंकेचा एक खेळाडू आहे. या चार खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये आपापल्या संघासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची २०२४ सालातील ‘टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’साठी नामांकन केले आहे. या वर्षी बुमराह कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. बुमराह व्यतिरिक्त, या यादीमध्ये श्रीलंकेचा कमिंडू मेंडिस, इंग्लंडचा जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनाही ICC ने या सन्मानासाठी नामांकन दिले आहे.