फोटो सौजन्य - सोशल मीडिया
एमएस धोनी व्हिडीओ : भारताचा माजी कर्णधार आणि भारताला दोन आयसीसी ट्रॉफी मिळवून देणारा महेंद्रसिंह धोनी त्याच्या चतुराईने ओळखला जातो. त्याने असे अनेक सामने आहेत जे विरोधक जिंकू शकत होते पण त्याच्या चतुराईने ते सामने त्याने भारताला जिंकून दिले आहेत. त्याचबरोबर तो भारताचा सर्वात यशस्वी आणि क्रिकेट जगतातील महान कर्णधारांमध्ये केली जाते. त्याच्या विकेटकीपिंगचीही चर्चा जगभरामध्ये होते, त्याची गणना महान यष्टिरक्षकांमध्ये केली जाते. बऱ्याचदा आयपीएलमध्ये देखील पाहायला मिळाले आहे की तो सामना संपल्यानंतर बऱ्याचदा युवा खेळाडूंना क्रिकेटची माहिती देत असतो. भारतीय क्रिकेटमध्ये फार कमी लोक आहेत जे धोनीच्या ज्ञानावर प्रश्न उपस्थित करतील. परंतु आता नुकतीच एक धोनीने मुलाखत दिली आहे यामध्ये त्याने अनेक मोठे खुलासे केला आहेत.
भारताचा माजी कर्णधार धोनीची पत्नी साक्षीने एकदा त्याच्या विकेटकीपिंग आणि क्रिकेटच्या ज्ञानावर प्रश्न उपस्थित केले होते. याचा खुलासा स्वतः धोनीने केला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दोन विश्वचषक जिंकले आहेत. २००७ साली भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला T२० विश्वचषक जिंकला होता. चार वर्षांनंतर भारताने २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला. धोनी नुकताच एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात धोनीने एक घटना सांगितली जिथे त्याच्या पत्नीने धोनीच्या क्रिकेट ज्ञानावर प्रश्न उपस्थित केले होते. धोनी म्हणाला, “आम्ही घरी एकदिवसीय सामना पाहत होतो. साक्षीही माझ्यासोबत होती. सहसा आपण क्रिकेटबद्दल बोलत नाही. त्या सामन्यात गोलंदाजाने वाइड बॉल टाकला होता आणि फलंदाजाने तो मारण्याचा प्रयत्न केला पण तो चुकला. त्यानंतर पंचाने रिव्ह्यू घेतला आणि तोपर्यत बॅट्समन मैदानाच्या बाउंड्री पर्यत पोहोचला होता.
हेदेखील वाचा – Hardik Pandya : बाप-लेकाचं प्रेम झालं कॅमेरात कैद! हार्दिक पांड्याची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
या घटनेवर साक्षीने सांगितले की तो आऊट नाही आहे. तर त्यावेळी धोनीने त्याच्या पत्नीला सांगितलं की वाईड बॉलवर जर फलंदाज पुढे आला स्टंप आऊट केलं तर आऊट दिल जात. यावर साक्षी धोनीला म्हणते की नाही तुला काही कळत नाही. त्याला पुन्हा अंपायर मैदानात बोलावतील. त्यानंतर अंपायरने आऊट दिले आणि पुढचा फलंदाज आला तेव्हा साक्षी म्हणाली की काही तरी चुकीचे झाले आहे. हा किस्सा ऐकून कार्यक्रमाला बसलेले प्रेक्षक जोरजोरात हसू लागले.
That too during stumping 😂😂 https://t.co/L52s1co45n pic.twitter.com/ANSQCBJZNw
— shruti ✿ (@lostshruu) October 27, 2024
धोनीच्या विकेटकीपिंगचे जगाने कौतुक केले. विकेटच्या मागे त्याची चपळता विलक्षण वेगवान आहे. त्याने अनेक वेळा असे स्टंपिंग केले आहेत ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. धोनीने आपल्या यष्टिरक्षणाने अनेक सामने बदलले आहेत. त्याचा क्रिकेटचा मेंदूही उत्कृष्ट आहे. त्याचबरोबर आयपीएल २०२५ च्या ऑक्शनच्या चर्चा सुरु झाल्या आहेत, यामध्ये चेन्नईच्या संघामध्ये धोनी खेळणार की नाही असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.