फोटो सौजन्य - सोशल मीडिया
हार्दिक पांड्याची इंस्टाग्राम पोस्ट : भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने बांग्लादेश विरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली होती. टीम इंडियाने बांग्लादेशविरुद्ध झालेल्या मालिकेत एकतर्फी विजय मिळवला होता. त्यानंतर आगामी काही दिवसांमध्ये भारताचा संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असणार आहे. यामध्ये हार्दिक पांड्याला देखील संघामध्ये स्थान मिळाले आहे. विश्वचषकानंतर हार्दिक पांड्याच्या फॅनफॉलोईंगमध्ये कमालीची वाद झाली आहे. त्याचबरोबर त्याने केलेल्या कामगिरीचे सोशल मीडियावर सतत कौतुक केले जात आहे. हार्दिक आणि त्याचा मुलगा अगस्तचे बऱ्याचदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतो. घटस्फोटानंतर हार्दिकचा मुलगा त्याची माजी पत्नी नताशा सोबत बाहेर देशामध्ये काही महिने राहिला त्यानंतर आता तो पुन्हा भारतामध्ये आला आहे. त्यानंतर हार्दिक पांड्या त्याचा मुलगा अगस्त्यला सतत भेटत आहे. ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात.
आता हार्दिक पांड्या आणि अगस्त्यचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत. सोशल मीडिया यूजर्सचे म्हणणे आहे की, वडील आणि मुलामध्ये एक अप्रतिम बॉन्डिंग आहे. मात्र, हार्दिक पांड्या आणि अगस्त्यचे हे छायाचित्र कुठले आहे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, हे अलीकडचे चित्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने नुकतीच आपला मुलगा अगस्त्याची भेट घेतली. या पोस्टवर त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “थकवणाऱ्या दिवसानंतर त्याच्या पायावर डोके ठेवून विश्रांती मिळणे ही आतापर्यंतची सर्वोत्तम भावना आहे”.
अलीकडेच नताशा स्टॅनकोविकने रमेश तौरानीच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीत नताशा स्टॅनकोविकचे सौंदर्य पाहण्यासारखे होते. यावेळी तिने लाल साडी घातली होती, जी तिने कॉर्सेट ब्लाउजसोबत जोडली होती, नताशा स्टॅनकोविक या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. नताशा स्टॅनकोविकने फिटनेस कोच अलेक्झांडर ॲलेक्ससोबत पार्टीला हजेरी लावली होती, जो दिशा पटानीला डेट करत असल्याची अफवा पसरली होती, मात्र आता अलेक्झांडर ॲलेक्सचे नाव नताशा स्टॅनकोविकसोबत जोडले जात आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये T२० मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भारताचा संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. यासाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे. त्यामुळे भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन कशाप्रकारची कामगिरी केली हे पाहणं महत्वाचं ठरेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका ८ नोव्हेंबरपासून आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघामध्ये चार T२० मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.