Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs WI: कॅरिबियन कर्णधाराने केली पाकिस्तानची धुलाई! शाई होपने एकदिवसीय सामन्यात रचला इतिहास..

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने शतकी खेळी करून मोठी कामगिरी केली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 13, 2025 | 02:29 PM
PAK vs WI: Caribbean captain thrashes Pakistan! Shai Hope creates history in ODI..

PAK vs WI: Caribbean captain thrashes Pakistan! Shai Hope creates history in ODI..

Follow Us
Close
Follow Us:

PAK vs WI: पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेचा समारोप झाला आहे. या दोन संघात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानवर एकतर्फी २०२ धावांनी विजय मिळवला आहे. हा पाकिस्तानसाठी लाजिरवाणा पराभव मनाला जात आहे. दुसरीकडे, हा विजय वेस्ट इंडिज संघासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे. या सामन्यात कॅरेबियन शाई होपने कर्णधाराला साजेशी खेळी साकारली आहे.

शाई होपच्या नावे नोंदला हा विक्रम

शाई होपने तिसऱ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १२० धावांची धमाकेदार खेळी केली. यासह, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक महत्त्वाची कामगिरी करून दाखवली आहे. शाई होप एकदिवसीय स्वरूपात १८ शतके करणारा वेस्ट इंडिजचा तिसरा खेळाडू ठरला आहे. सर्वाधिक शतकांच्या बाबतीत शाई होप तिसऱ्या स्थानावर जाऊन पोहचला आहे.

हेही वाचा : Suresh Raina: बेटिंग App प्रकरणात सुरेश रैनावर कोणते आरोप? ED च्या फेऱ्यात अडकला, चौकशीसाठी बोलावले

सर्वाधिक एकदिवसीय शतके करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या यादीमध्ये ख्रिस गेल आणि ब्रायन लारा या दिग्गजांची नावे आहेत. ख्रिस गेलने २९८ सामन्यांमध्ये २५ शतके ठोकली आहेत. तर ब्रायन लाराने २९५ सामन्यांमध्ये १९ शतके साकारली आहेत.

शाई होपची निर्णायक खेळी

वेस्ट इंडिजला गरज असताना शाई होपने ही शतकी खेळी साकारली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने जिंकला होता, त्यानंतर वेस्ट इंडिजने पुढचा सामना जिंकला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली होती. अशा परिस्थितीत तिसरा आणि शेवटचा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक होता. यामध्ये वेस्ट इंडिजने बाजी मारली आणि मालिका २-१ अशी जिंकली.

त्रिनिदादमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर, वेस्ट इंडिज प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरले. यावेळी त्यांची स्थिती वाईट झाली. वेस्ट इंडिजच्या ६८ धावांत तीन विकेट गेल्या असताना शाई होपने कर्णधारपदाची खेळी खेळत शतक झळकावले. शाई होपने शेरफेन रुदरफोर्ड (१५) सोबत तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. तसेच त्याने जस्टिन ग्रीव्हज सोबत ११० धावांची अभ्येद्य भागीदारी रचली आणि वेस्ट इंडिजचा डाव २९४ पर्यंत पोहचवला.

हेही वाचा : WI Vs PAK: अरेरे! इतका लाजिरवाणा पराभव, केवळ 92 धावांत पाकिस्तानचा धुव्वा; 34 वर्षांनी वेस्ट इंडिजचा धमाकेदार विजय

शाई होपची शतकी खेळी.

शाई होपने ८३ चेंडूत आपले शतक झळकावले. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १८ वे शतक ठरले. तर हे त्याचे पाकिस्तानविरुद्धचे दुसरे एकदिवसीय शतक होते. या डावात शाई होपने ९४ चेंडूत १२० धावा केल्या. यामध्ये त्याने ५ षटकार आणि १० चौकार लगावले. तर ग्रीव्हज २४ चेंडूंमध्ये ४३ धावा करून नाबाद राहिला.

Web Title: Captain shai hope becomes west indies third highest odi century scorer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • Brian Lara
  • Chris Gayle
  • WI vs PAK

संबंधित बातम्या

Pak vs WI : शाई होपच्या रडारवर लारा आणि गेलचा विक्रम! चालून आली ‘ही’ नामी संधी; बनणार वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू
1

Pak vs WI : शाई होपच्या रडारवर लारा आणि गेलचा विक्रम! चालून आली ‘ही’ नामी संधी; बनणार वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू

WI Vs PAK: अरेरे! इतका लाजिरवाणा पराभव, केवळ 92 धावांत पाकिस्तानचा धुव्वा; 34 वर्षांनी वेस्ट इंडिजचा धमाकेदार विजय
2

WI Vs PAK: अरेरे! इतका लाजिरवाणा पराभव, केवळ 92 धावांत पाकिस्तानचा धुव्वा; 34 वर्षांनी वेस्ट इंडिजचा धमाकेदार विजय

W,W,W मालिकेत बरोबरी…रोस्टन चेस – रदरफर्ड केली कमाल! WI VS PAK सामन्यात 5 विकेट्सने पाकला केलं पराभूत
3

W,W,W मालिकेत बरोबरी…रोस्टन चेस – रदरफर्ड केली कमाल! WI VS PAK सामन्यात 5 विकेट्सने पाकला केलं पराभूत

FC क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारे 5 फलंदाज, भारतीयांनी केल्या 400+ धावा; ब्रॅडमन तिसऱ्या क्रमांकावर
4

FC क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारे 5 फलंदाज, भारतीयांनी केल्या 400+ धावा; ब्रॅडमन तिसऱ्या क्रमांकावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.