Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Champions Trophy Live Streaming: चॅम्पियन्स ट्रॉफी कुठे पाहता येणार, कसे असणार शेड्युल; पहा यादी

१९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात होईल. तर भारताचा पहिला सामना हा गुरूवारी बांगलादेशविरूद्ध रंगणार आहे. कसे आहे वेळापत्रक जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 19, 2025 | 02:45 PM
चॅम्पियन ट्रॉफीचे वेळापत्रक (फोटो सौजन्य - Instagram)

चॅम्पियन ट्रॉफीचे वेळापत्रक (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तान आणि युएईमध्ये होणाऱ्या बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. या प्रतिष्ठित आयसीसी स्पर्धेची सुरुवात बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होईल. भारत आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळेल, तर उर्वरित सामने पाकिस्तानमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी – रावळपिंडी, लाहोर आणि कराची येथे होतील. 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया गुरुवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या स्पर्धेचा अंतिम सामना ९ मार्च रोजी खेळला जाईल. जर भारत अंतिम फेरीत पोहोचला तर हा सामना दुबईमध्ये होईल, अन्यथा हा सामना लाहोरमध्ये होईल. दुसरा उपांत्य सामना लाहोरमध्ये खेळला जाईल. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी दोन्हीमध्ये राखीव दिवस असतील.

असे असतील दोन गट 

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी, सर्व आठ संघांना प्रत्येकी चार अशा दोन गटात विभागण्यात आले आहे. गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश आहेत, तर दुसऱ्या गटात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दिवस-रात्र असतील.

Champions Trophy 2025 : टीम इंडियाला चॅम्पियन होण्यासाठी हवेत 5 विजय; चौथ्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी होणार टक्कर

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना कधी खेळला जाईल?

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला सामना बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना खेळला जाणार आहे. पाकिस्तान स्वतः यावेळी यजमान असल्यामुळे सर्वांचे या सामान्याकडे लक्ष लागून राहिले आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या या सामन्यानंतर अंदाज वर्तविले जातील. 

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे सामने किती वाजता सुरू होतील?

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होतील. सामन्याचा नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी २:०० वाजता होईल आणि त्यानंतर अर्ध्या तासात या सामन्याचा आनंद प्रेक्षकांना लुटता येईल. तुम्ही लाईव्ह कुठे पाहू शकता? हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर याचेही उत्तर आमच्याकडे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. याशिवाय, सामने Jio Hotstar वर लाईव्ह स्ट्रीम केले जातील.

Champions Trophy 2025 : काय आहे ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’चा इतिहास; पहिल्यांदा कधी खेळली गेली स्पर्धा; फक्त ८ संघच का निवडले जातात

चॅम्पियन्स ट्रॉफी वेळापत्रक:

  • १९ फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची, पाकिस्तान
  • २० फेब्रुवारी, बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई
  • २१ फेब्रुवारी, अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची, पाकिस्तान
  • २२ फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर, पाकिस्तान
  • २३ फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
  • २४ फेब्रुवारी, बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी, पाकिस्तान
  • २५ फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी, पाकिस्तान
  • २६ फेब्रुवारी, अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर, पाकिस्तान
  • २७ फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी, पाकिस्तान
  • २८ फेब्रुवारी, अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर, पाकिस्तान
  • १ मार्च, दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची, पाकिस्तान
  • २ मार्च, न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई
  • ४ मार्च, उपांत्य फेरी १, दुबई
  • ५ मार्च, उपांत्य फेरी २, लाहोर, पाकिस्तान
  • ९ मार्च, अंतिम फेरी, लाहोर (भारत पात्र ठरला तर हा सामना दुबईमध्ये खेळला जाईल)
  • १० मार्च, राखीव दिवस

Web Title: Champions trophy 2025 live streaming full schedule with details check where and how to watch live in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • Captain Rohit Sharma
  • Champion Trophy 2025
  • ICC Champions Trophy
  • indian team

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.