Intelligence agencies warn of a possible ISKP attack on the 2025 Champions Trophy in Pakistan
Champions Trophy 2025 Semi Final : आता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे आणखी पाच ग्रुप सामने खेळवले जाणार आहेत. आतापर्यंतच्या परिस्थितीवर नजर टाकली तर, दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत आणि दोन संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. गट अ चा मुद्दा पूर्णपणे मिटला आहे. पण ग्रुप बी च्या सेमीफायनलची परिस्थिती अद्याप स्पष्ट नाही. भारत आणि न्यूझीलंड यांनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन गट
जर आपण ग्रुप अ बद्दल बोललो तर त्यात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. भारत आणि न्यूझीलंड यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. त्याने पाकिस्तान आणि बांगलादेशला हरवले आहे. भारताचे ४ गुण आहेत. न्यूझीलंडनेही दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. न्यूझीलंडने पाकिस्तान आणि बांगलादेशलाही पराभूत केले आहे.
पाकिस्तान-बांगलादेशची परिस्थिती वाईट
मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाची अवस्था वाईट आहे. प्रथम न्यूझीलंड आणि नंतर भारताकडून पराभव पत्करावा लागला. दोन्ही सामने गमावल्यानंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याचा नेट रनरेटही उणे आहे. बांगलादेशनेही दोन्ही सामने गमावले आहेत. आता या दोन्ही संघांसाठी कोणताही मार्ग उरलेला नाही.
गट ब ची स्थिती अद्याप अस्पष्ट
ग्रुप बी मध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना मंगळवारी खेळवला जाणार होता. पण, पावसामुळे हा सामना रद्द झाला. यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. दक्षिण आफ्रिका पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांनी दोन सामने खेळले आहेत आणि प्रत्येकी एक जिंकला आहे. इंग्लंड आणि अफगाणिस्तानने प्रत्येकी एक सामना खेळला आहे आणि त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या गटाच्या उपांत्य फेरीची परिस्थिती अद्याप स्पष्ट नाही.
हेही वाचा : Yuzvendra Chahal Dhanashree : घटस्फोटापूर्वी चहलला धनश्रीबद्दल कळले होते सत्य; जगासमोर व्यक्त केले आपले दुःख