
भारत विरुद्ध नेपाळ : भारताचा संघ आज नेपाळविरुद्ध लढणार आहे. आशिया कपमधील आज भारताचा संघ तिसरा सामना खेळणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध झाला होता. हा सामना भारताच्या महिला क्रिकेट संघाने ७ विकेट्सने जिंकला होता. त्यानं भारताचा सामना युएई विरुद्ध झाला या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने एकतर्फी विजय मिळवून सेमीफायनलचा मार्ग मोकळा केला आहे. आज भारताचा शेवटचा साखळी सामना रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता रंगणार आहे. आजच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवल्यास सेमीफायनलमध्ये जागा पक्की करणार आहे.
आशिया कपमध्ये आठ संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये चार-चार संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. पहिल्या गटामध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि नेपाळ या संघाचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटामध्ये श्रीलंका, थायलंड, बांग्लादेश आणि मलेशिया या संघाचा समावेश आहे.
पहिल्या गटाच्या गुणतालिकेवर नजर टाकली असता. भारताचा महिला क्रिकेट संघ अव्वल स्थानावर आहे. भारताच्या संघाने सलग दोन सामने जिंकून ४ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा संघ आहे. पाकिस्तानच्या संघाचे आतापर्यत २ सामने झाले आहेत यामध्ये त्यांनी १ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत झाले आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अनुक्रमे नेपाळ आणि युएईचा संघ आहे. नेपाळच्या संघाने २ सामन्यांपैकी १ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर युएईच्या संघ दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे.
दुसऱ्या गटामध्ये अव्वल स्थानावर श्रीलंकेचा संघ आहे. संघाने दोन्ही साखळी सामने जिंकले आहेत. त्यानंतर मलेशियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. मलेशियाच्या संघाने २ सामन्यांपैकी १ सामन्यामध्ये विजय मिळवला आहे. पॉईंट टेबलवर तिसऱ्या स्थानावर बांग्लादेशचा संघ आहे. बांग्लादेशच्या महिला क्रिकेट संघाने आतापर्यत २ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांनी १ सामन्यामध्ये विजय मिळवला आहे. त्यानंतर शेवटच्या स्थानावर थायलंडचा संघ आहे त्यांनी या स्पर्धेमध्ये अजुनपर्यत एकही सामना जिंकलेला नाही.