Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB कडून 43 धावांनी CSK चा पराभव तरीही बनवला World Record, T20 मध्ये अनोखा रेकॉर्ड!

5 एप्रिल रोजी, आयपीएल 2026 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात RCB ने CSK चा 43 धावांनी पराभव केला. या पराभवानंतरही चेन्नईने एक विश्वविक्रम प्रस्थापित केला.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 06, 2026 | 12:12 PM
सीएसकेच्या नावे अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

सीएसकेच्या नावे अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • सीएसकेच्या नावे अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड 
  • मॅच हरूनही नक्की कोणता झाला रेकॉर्ड 
  • RCB कडून CSK ची हार 
आयपीएल २०२६ चा ११ वा सामना ५ एप्रिल रोजी बंगळूरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने चेन्नईचा ४३ धावांनी पराभव केला. चेन्नईने या हंगामातील आपला सलग तिसरा सामना गमावला. सीएसकेला अजूनही आपले खाते उघडायचे आहे. तथापि, बंगळूरुविरुद्ध पराभव होऊनही, चेन्नई सुपर किंग्सने एक विश्वविक्रम रचला आहे आणि आता तुम्ही म्हणाल की कोणता विक्रम? तर त्यासाठी नक्की वाचा 

RCB Beat CSK: चिन्नास्वामीवर आरसीबीचा ‘रॉयल’ धमाका! चेन्नई ‘सुपर फ्लॉप’; बंगळुरूचा 43 धावांनी दणदणीत विजय

चेन्नई सुपर किंग्सने विश्वविक्रम रचला

खरं तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध धावांचा पाठलाग करताना, चेन्नई सुपर किंग्सच्या नऊ खेळाडूंनी किमान एक षटकार मारला. टी२० क्रिकेटच्या इतिहासात फलंदाजी करताना किमान नऊ खेळाडूंनी षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयुष म्हात्रे आणि मॅट हेन्री हे दोघेच असे खेळाडू होते ज्यांना एकही षटकार मारता आला नाही. चेन्नई सुपर किंग्सने आपल्या डावात एकूण ११ षटकार मारले.

सरफराज खानने आयपीएलमध्ये इतिहास रचला

एकेकाळी ३०/३ अशा बिकट परिस्थितीत असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने, सरफराजच्या खेळीमुळे अवघ्या १९ चेंडूंमध्ये ७७/३ अशी मजल मारली. त्याच्या या खेळीने एक महत्त्वपूर्ण आयपीएल विक्रमही रचला. आयपीएलमध्ये चौथ्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना पहिल्या सहा षटकांत अर्धशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. आरसीबीविरुद्ध सरफराजचे हे दुसरे आयपीएल अर्धशतक होते. यापूर्वी त्याने ६ एप्रिल २०१९ रोजी पंजाब किंग्सकडून खेळताना आपले पहिले अर्धशतक झळकावले होते. या उजव्या हाताच्या फलंदाजाने २,५५६ दिवसांनंतर, ५ एप्रिल २०२६ रोजी आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले. हे सरफराजचे सलग दुसरे आयपीएल अर्धशतक आहे.

RCB vs CSK Live Score: चिन्नास्वामीवर आरसीबीचा ‘कहर!’ डेव्हिड-पडिक्कलने चेन्नईला धु धु धुतले; विजयासाठी 251 धावांचे लक्ष्य

सामना कसा झाला 

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून आरसीबीविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत, प्रथम फलंदाजी करताना बंगळूरने निर्धारित २० षटकांत ३ गडी गमावून २५० धावा केल्या. टीम डेव्हिडने २५ चेंडूंमध्ये ७० धावांची वादळी खेळी केली. २८० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ८ षटकार मारले. देवदत्त पडिक्कलनेही ५० धावा केल्या. रजत पाटीदार १९ चेंडूंमध्ये ४८ धावा करून नाबाद राहिला. फिल सॉल्ट ४६ धावा करून बाद झाला. अंशुल कंबोज, जेमी ओव्हरटन आणि शिवम दुबे यांनी सीएसकेसाठी प्रत्येकी १ बळी घेतला.

Web Title: Chennai super kings aka csk created world record in t20 vs royal challengers bangaluru despite 43 runs loss in ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • IPL
  • IPL 2026
  • RCB vs CSK

संबंधित बातम्या

IPL 2027: इम्पॅक्ट प्लेयर नियम गोलंदाजांसाठी काळ? Suresh Raina म्हणाला, ‘हे केवळ…’
1

IPL 2027: इम्पॅक्ट प्लेयर नियम गोलंदाजांसाठी काळ? Suresh Raina म्हणाला, ‘हे केवळ…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.