फोटो सौजन्य - X/BCCI सोशल मीडिया
रोहित शर्माची फिटनेस : भारताचा संघ सध्या चॅम्पियन ट्रॉफीचे सामने खेळत आहे, यामध्ये टीम इंडियाने एकही सामना न गमावता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता भारताचा संघ चॅम्पियन ट्रॉफीच्या उपांत्य फेरीमध्ये दुबई आंतराष्ट्रीय स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. ४ मार्च रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. त्याआधी आता भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मागील काही महिने रोहित शर्मा खराब फॉर्ममध्ये होता त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये शतक ठोकले आणि पुन्हा फॉर्म मिळवला आहे.
पण आता पुन्हा एकदा त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यावेळी हा प्रश्न काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर एएनआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे, यामध्ये काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी इंडियाज हिटमॅनवर वादग्रस्त टिप्पणी करताना दिसत आहेत, त्यानंतर काँग्रेस नेत्यावर सर्वत्र टीका होत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी भारताचा कर्णधार रोहित शर्माला खेळाडू म्हणून जाड म्हटले आहे आणि त्याच्या कर्णधारपदाचेही अप्रभावी वर्णन केले आहे. त्याने कॅप्टनबद्दल X वर एक पोस्ट देखील केली. रोहितच्या या विधानामुळे त्याचे चाहते खूपच नाराज आहेत.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना शमा म्हणाली, “हे एका खेळाडूच्या फिटनेसबद्दलचे एक सामान्य ट्विट होते. हे बॉडी शेमिंग नव्हते, मला नेहमीच असे वाटते की खेळाडूने तंदुरुस्त राहिले पाहिजे आणि मला वाटले की त्याचे वजन थोडे जास्त आहे, म्हणून मी त्याबद्दल ट्विट केले. माझ्यावर कोणतेही कारण नसताना हल्ला झाला. जेव्हा मी त्याची तुलना मागील कर्णधारांशी केली तेव्हा मी एक विधान केले. मला अधिकार आहे, असं म्हणण्यात काय चूक आहे? ही लोकशाही आहे…”
#WATCH | On her comment on Indian Cricket team captain Rohit Sharma, Congress leader Shama Mohammed says, “It was a generic tweet about the fitness of a sportsperson. It was not body-shaming. I always believed a sportsperson should be fit, and I felt he was a bit overweight, so I… pic.twitter.com/OBiLk84Mjh
— ANI (@ANI) March 3, 2025
या व्हिडीओ मागे कहाणी अशी आहे की,सोशल मीडियावर रोहित शर्माच्या फिटनेसबाबत शमा मोहम्मद वक्तव्य केले होते ते आता डिलीट करण्यात आले आहे. या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, रोहित शर्मा एक खेळाडू म्हणून जाड आहे. त्याला वजन कमी करायचे आहे! आणि अर्थातच, भारताचा सर्वात अकार्यक्षम कर्णधार. शमाच्या या पोस्टवर चाहत्यांनी रोहितचा बचाव केला आणि त्याच्या फिटनेस आणि कर्णधारपदाचे समर्थन केले. या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शमा मोहम्मदला खरी खोटी सुनावण्यात आली होती.