
फोटो सौजन्य - JioHotstar
MI vs RCB WPL 2026 : महिला प्रीमियर लीग ९ जानेवारी रोजी सुरू झाली. पहिला सामना हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स आणि स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. पहिल्या सामन्यामध्ये मुंबईच्या संघाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध कधीही सामना जिंकला नव्हता ही साखळी कालच्या सामन्यामध्ये मोडण्यात आली आहे आणि महिला प्रिमियर लीग 2026 च्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला पराभूत केले.
नॅडिन डी क्लार्कने मुंबई इंडियन्सने जिंकलेला सामना हातातून हिसकावला आणि महिला प्रिमीयर लीग 2026 चा आरसीबीने पहिला विजय नावावर नोंदवला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने १५४ धावा केल्या. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना चांगली कामगिरी करू शकल्या नाहीत. लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला. पराभवानंतर हरमनप्रीत कौरने एक महत्त्वपूर्ण विधान केले.
शेवटच्या षटकात विजयासाठी १८ धावांची आवश्यकता असताना, आरसीबीची स्टार फलंदाज नॅडिन डी क्लार्कने शानदार अर्धशतक झळकावले आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामध्ये आरसीबीला विजयासाठी एका चेंडूवर दोन धावांची आवश्यकता असताना शेवटच्या चेंडूवर चौकार मारण्याचा समावेश होता.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत ६ बाद १५४ धावा केल्या. संघाकडून सजीवना सजनाने सर्वाधिक २५ चेंडूत ४५ धावा केल्या, तर निकोला कॅरीने २९ चेंडूत ४० धावा केल्या. हरमनप्रीत कौरनेही १७ चेंडूत २० धावा केल्या. जी. कमलिनीच्या २८ चेंडूत ३२ धावा केल्याने आरसीबीला त्यांच्या पाठलागात मध्यम सुरुवात मिळाली. सलामीवीर ग्रेस हॅरिसने १२ चेंडूत २५ धावा केल्या आणि स्मृती मानधनाने १३ चेंडूत १८ धावा केल्या. त्यानंतर नॅडिन डी क्लार्कने ४४ चेंडूत ६३ धावांची शानदार खेळी केली, ज्यामध्ये ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. आरसीबीने २० षटकांत ७ बाद १५७ धावा करून लक्ष्य गाठले.
🚨𝐇𝐚𝐫𝐦𝐚𝐧𝐩𝐫𝐞𝐞𝐭 𝐊𝐚𝐮𝐫 🗣️: Well, we know that she (De Klerk) has that much capacity to score runs in the last over but I think we didn’t bowl one good ball. I think that was needed in the last over. Sometimes it happens. We gave her 2-3 chances and she made us pay for… pic.twitter.com/0RJBBClVAi — RCB (@RCBtweetzz) January 10, 2026
रविवारी 10 जानेवारी रोजी महिला प्रिमियर लीग 2026 चे दोन सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये पहिला सामना हा गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वाॅरियर्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये आजचा दुसरा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमावला आहे त्यांना आज स्पर्धेत पहिला विजय नोंदवण्याची संधी असणार आहे.