Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cristiano Ronaldo: रोनाल्डोचा नॉकआउट गोल! विश्वचषकात रचला इतिहास; क्रोएशियावर 2-1 ने मात करत पोर्तुगालची राऊंड ऑफ 16 मध्ये धडक

Cristiano Ronaldo Goal in Knockout Portugal Beat Croatia: पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने क्रोएशियाविरुद्धच्या राऊंड ऑफ ३२ च्या सामन्यात गोल करून, विश्वचषकाच्या इतिहासात नॉकआऊट सामन्यात गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनण्याचा पराक्रम केला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 03, 2026 | 01:45 PM
photo - social media

photo - social media

Follow Us
Follow Us:
  • रोनाल्डोचा नॉकआउट गोल
  • क्रोएशियावर 2-1 ने मात
  • पोर्तुगालची राऊंड ऑफ 16 मध्ये धडक
फिफा विश्वचषक २०२६ च्या ( FIFA World Cup 2026) राउंड ऑफ ३२ फेरीत पोर्तुगाल आणि क्रोएशिया यांच्यात टोरोंटो स्टेडियमवर सामना खेळला गेला. पोर्तुगालने हा सामना २-१ ने जिंकून १६ संघांच्या ( Round of 16) फेरीत आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पेनल्टी मिळाल्यानंतर निर्णायक क्षणी गोल केला. रोनाल्डो आता विश्वचषकाच्या इतिहासात बाद फेरीच्या सामन्यात गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.

IND vs ENG: श्रेयस अय्यरचा धमाका! इंग्लंडमध्ये टी-20 अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार; विराट कोहलीलाही टाकले मागे

पोर्तुगालनचा शेवटच्या क्षणी  विजय

क्रोएशियाविरुद्धचा राऊंड ऑफ ३२ चा सामना पोर्तुगालसाठी अजिबात सोपा नव्हता, कारण पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या हाफच्या ५३ व्या मिनिटाला क्रोएशियाच्या पेरिसिचने गोल करून आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर पोर्तुगालने जोरदार पुनरागमन केले आणि ६४ व्या मिनिटाला रोनाल्डोने पेनल्टीवर गोल करून स्कोअर १-१ असा बरोबर केला. त्यानंतर ८१ व्या मिनिटाला रोनाल्डोला बदली करण्यात आले आणि त्याच्या जागी रुबेन नेवेसला खेळवण्यात आले. ९० व्या मिनिटाला, राफेल लिओच्या क्रॉसवर रामोसने हेडरद्वारे गोल करून पोर्तुगालला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

क्रोएशियानेही गोल केला, पण पोर्तुगालने केली अपील

पोर्तुगालने २-१ अशी आघाडी घेतल्यानंतर, क्रोएशियाने आक्रमक खेळ करत ९० व्या मिनिटाला गोल केला. मात्र, पोर्तुगालने ऑफसाईडसाठी अपील केले, जे पंचांनी तपासले आणि VAR ने ठरवले की क्रोएशियन खेळाडूने पास दिला तेव्हा त्यांचा दुसरा खेळाडू ऑफसाईड होता, त्यामुळे तो गोल अवैध ठरवण्यात आला. खेळ तीन मिनिटे सुरू राहिला आणि पंचांनी शिट्टी वाजवताच पोर्तुगाल २-१ ने जिंकला.

रोनाल्डोने विश्वचषकमध्ये बाद फेरीच्या सामन्यात पहिला गोल

रोनाल्डोने या विश्वचषकात आतापर्यंत तीन गोल केले आहेत, ज्यात उझबेकिस्तानविरुद्धच्या गट फेरीतील सामन्यातील दोन गोलांचा समावेश आहे. यानंतर, बाद फेरीच्या सामन्यात कधीही गोल न करण्याचा आपला विक्रम मोडण्याचे सर्वात मोठे आव्हान त्याच्यासमोर होते. रोनाल्डोने क्रोएशियाविरुद्ध ६८ व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून आपल्या कारकिर्दीतील पहिला विश्वचषक बाद फेरीतील गोल नोंदवला. ४१ वर्षे आणि १४७ दिवसांचा असताना, रोनाल्डो विश्वचषक बाद फेरीच्या सामन्यात गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. त्याने पोर्तुगालचा माजी खेळाडू पेपेचा विक्रम मोडला, ज्याने २०२२ च्या विश्वचषकात स्वित्झर्लंडविरुद्ध ३९ वर्षे आणि २८३ दिवसांच्या वयात बाद फेरीच्या सामन्यात गोल केला होता.

राऊंड ऑफ १६ मध्ये पोर्तुगालसमोर स्पेनचे आव्हान असेल, ज्यांनी आतापर्यंत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. स्पेनने राऊंड ऑफ ३२ चा सामना ऑस्ट्रियाविरुद्ध ३-० ने जिंकला असून, या विश्वचषकात त्यांच्याविरुद्ध एकही गोल झालेला नाही.

Bel vs Sen FIFA 2026: बेल्जियमचे ऐतिहासिक कमबॅक! 2-0 च्या पिछाडीवरून अखेरच्या क्षणी सेनेगलवर दणदणीत विजय

Web Title: Cristiano ronaldo knockout goal against croatia in fifa world cup portugal beat croatia round of 16

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Cristiano Ronaldo
  • Fifa World Cup
  • Football Tournament

संबंधित बातम्या

Ronaldo: क्रिस्टियानो रोनाल्डोने का घातली 21 नंबरची जर्सी? पोर्तुगालचा बादशाह जिंकल्यानंतर का झाला भावुक, ढसाढसा रडला
1

Ronaldo: क्रिस्टियानो रोनाल्डोने का घातली 21 नंबरची जर्सी? पोर्तुगालचा बादशाह जिंकल्यानंतर का झाला भावुक, ढसाढसा रडला

Eng Vs Dr congo FIFA 2026: हॅरी केनचा डबल धमाका! इंग्लंडचा काँगोवर 2-1 ने थरारक विजय, राऊंड ऑफ 16 मध्ये धडक
2

Eng Vs Dr congo FIFA 2026: हॅरी केनचा डबल धमाका! इंग्लंडचा काँगोवर 2-1 ने थरारक विजय, राऊंड ऑफ 16 मध्ये धडक

Bel vs Sen FIFA 2026: बेल्जियमचे ऐतिहासिक कमबॅक! 2-0 च्या पिछाडीवरून अखेरच्या क्षणी सेनेगलवर दणदणीत विजय
3

Bel vs Sen FIFA 2026: बेल्जियमचे ऐतिहासिक कमबॅक! 2-0 च्या पिछाडीवरून अखेरच्या क्षणी सेनेगलवर दणदणीत विजय

एकेकाळचे ‘जय-वीरू’ आज भिडणार! Ronaldo की Modric? फुटबॉल चाहत्यांसाठी असणार पर्वणी
4

एकेकाळचे ‘जय-वीरू’ आज भिडणार! Ronaldo की Modric? फुटबॉल चाहत्यांसाठी असणार पर्वणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.