Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cristiano Ronaldo Retirement: एका युगाचा अंत होणार? ‘कदाचित हे माझं शेवटचं…’; ख्रिस्तियानो रोनाल्डो मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Cristiano Ronaldo Drops Retirement Bombshell: ख्रिस्तियानो रोनाल्डो लवकरच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत स्वतः रोनाल्डोने दिले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 17, 2026 | 03:58 PM
photo - social media

photo - social media

Follow Us
Follow Us:
  • एका युगाचा अंत होणार?
  • ख्रिस्तियानो रोनाल्डो फुटबॉलमधून निवृत्ती घेणार
  • ५ वर्षांची कारकीर्द संपुष्टात येणार

फुटबॉलच्या जगातील पाच वेळा बॅलोन डी’ओर विजेता ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या निवृत्तीबद्दल सर्वात मोठा संकेत दिला आहे. या पोर्तुगीज दिग्गज फुटबॉलपटूने म्हटले आहे की, चालू हंगाम हा एक खेळाडू म्हणून त्याचे शेवटचे वर्ष असू शकते. ४१ वर्षीय रोनाल्डोचा सध्या सौदी प्रो- लीग क्लबच्या अल नासरसोबत जून २०२७ पर्यंत करार आहे. जरी त्याने भूतकाळात अनेक वेळा आपली खेळाडू कारकीर्द संपत आल्याचे मान्य केले असले, तरी त्याने निवृत्तीची कोणतीही विशिष्ट तारीख कधीही दिली नव्हती. आता, ‘वोग’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने म्हटले आहे की, हे कदाचित फुटबॉलमधील त्याचे शेवटचे वर्ष आहे आणि त्याला एक महान वारसा मागे ठेवायचा आहे.

पहिल्याच सीझनमध्ये चॅम्पियन! Manchester Super Giants चा ‘द हंड्रेड’च्या ट्रॉफीवर कब्जा; गोएंका यांची पोस्ट चर्चेत

हे फुटबॉलमधील माझे शेवटचे वर्ष…

रोनाल्डोने ‘वोग’ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, ‘हे कदाचित माझे फुटबॉलमधील शेवटचे वर्ष असेल आणि मला एक महान वारसा मागे ठेवायचा आहे.’ तो पुढे म्हणाला की, त्याने आपल्या भविष्याची योजना आखली आहे आणि फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याला व्यस्त ठेवण्यासाठी अनेक गोष्टी आहेत.’माझं भविष्य पूर्णपणे निश्चित आहे. मला व्यस्त ठेवण्यासाठी माझ्याकडे करायला भरपूर गोष्टी आहेत. निवृत्तीनंतर एक मोठी पोकळी निर्माण होऊ शकते, त्यामुळे तो वेळ अनेक गोष्टीन भरून काढायला हवा,’ असेही तो म्हणाला.

रोनाल्डोने गेल्या नोव्हेंबरमध्ये असेही म्हटले होते की तो आणखी एक-दोन वर्षे खेळू शकतो. त्याने हेही स्पष्ट केले होते की २०२६ चा विश्वचषक त्याचा शेवटचा असेल. गेल्या महिन्यात स्पेनकडून पराभूत झाल्यामुळे पोर्तुगाल २०२६ च्या फिफा विश्वचषकातून बाहेर पडला. परंतु, रोनाल्डोने फुटबॉलमधून पूर्णपणे कधी निवृत्त होईल हे स्पष्ट करण्यास नकार दिला.

कुटुंबावर आणि जीवनाचा आनंद घेण्यावर भर

रोनाल्डो म्हणाला की, त्याने फुटबॉल सोडल्यानंतरच्या आयुष्याचे नियोजन आधीच सुरू केले आहे. रोनाल्डोला आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे. तसेच मैदानाबाहेरील जीवनाचा देखील आनंद घ्यायचा आहे. तो म्हणाला की, फुटबॉलमधून निवृत्त झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी अनेक वेगवेगळ्या गोष्टींनी भरून काढावी लागेल. रोनाल्डोने प्रवास करणे, पॅडेल खेळणे आणि पाहणे यांसारख्या गोष्टींचा उल्लेख केला आणि सांगितले की त्याला आपल्या यशाचा आनंद घ्यायचा आहे. तो म्हणाला की, गेली २५ वर्षे त्याच्यासाठी त्याग आणि कठोर परिश्रमाने भरलेली होती. त्यामुळे, आता आयुष्याच्या इतर गोष्टींना वेळ देणे महत्त्वाचे आहे.

५ वर्षांची कारकीर्द संपुष्टात येणार

रोनाल्डो या वर्षी निवृत्त होणार असून हा त्याचा शेवटचा वर्ष असेल असे महत्वाचे संकेत त्याने दिले आहेत. रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीची सुरुवात स्पोर्टिंग सीपीमधून केली. त्यानंतर तो मँचेस्टर युनायटेड, रियल माद्रिद आणि युव्हेंटस यांसारख्या मोठ्या क्लब्सकडून खेळला. जानेवारी २०२३ पासून तो सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबसोबत आहे. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी काळ रियल माद्रिदमध्ये होता, जिथे त्याने ४३८ सामन्यांमध्ये विक्रमी ४५० गोल केले. रोनाल्डोने या वर्षीच्या विश्वचषकात तीन गोल करून पोर्तुगालला १६ संघांच्या फेरीत पोहोचण्यास मदत केली.

TREW vs SULW: आधी गोलंदाजांचा कहर, मग फलंदाजांचा प्रहार; Trent Rocketsचा दणदणीत ‘The Hundred’ विजय, लीड्सचा 8 विकेट्सनी सुपडा साफ

Web Title: Cristiano ronaldo retirement drops hint over probable last year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • Cristiano Ronaldo
  • Football Tournament
  • Retirement

संबंधित बातम्या

Breaking: Yuzvendra Chahal चा धक्कादायक निर्णय! अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला…
1

Breaking: Yuzvendra Chahal चा धक्कादायक निर्णय! अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.