द हंड्रेड लीग २०२६ चा अंतिम सामना १६ ऑगस्ट रोजी मँचेस्टर सुपर जायंट्स आणि ट्रेंट रॉकेट्स यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना, रॉकेट्सने १०० चेंडूंमध्ये १५८ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना, टिम सायफर्टने ३८ चेंडूंमध्ये ७२ धावांची धडाकेबाज खेळी करून एमएसजीच्या विजयाचा पाया रचला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि सात षटकार मारले. जोस बटलर आणि ल्यूस डी प्लोय यांनीही छोट्या खेळी करून महत्त्वपूर्ण योगदान दिले.
हा विजय संजीव गोएंका यांच्यासाठीही खास होता, कारण मँचेस्टर सुपरजायंट्सने त्यांच्या क्रिकेट फ्रँचायझीसाठी एका नव्या पर्वाची सुरुवात केली. गोएंका हे आयपीएलच्या लखनौ सुपरजायंट्सचे सह-मालक देखील आहेत.
मात्र, यावेळी विजेतेपद जिंकल्यानंतर ते खूपच भावूक झालेले दिसले. त्याने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संघाचे अभिनंदन करताना लिहिले, ‘पहिल्याच हंगामात चॅम्पियन्स! लॉर्ड्सवरची ही रात्र अविस्मरणीय होती. आम्हा सर्वांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे.’
त्यांनी पुढे लिहिले की, पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत हा सांघिक प्रयत्न होता. टिम, काय शानदार खेळी होती. नूर, गोलंदाजीचा अप्रतिम स्पेल आणि गरजेच्या वेळी विकेट्स. जोसने संपूर्ण हंगामात आघाडीवरून नेतृत्व केले. नॉकआऊट फेरीत संपूर्ण संघ ज्या प्रकारे एकत्र आला, त्यामुळे हा हंगाम बदलला. जोस आणि हे शक्य करणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे अभिनंदन. आमच्या फॅन्सचे विशेष आभार. तुम्ही सर्वांनी या संघाला शेवटपर्यंत पोहोचवले. हा विजय तुम्हा सर्वांसाठी आहे.’
Champions in our very first season! @ManchesterSG100 What a night it has been at Lord’s, a proud moment for all of us in the Super Giants family. This was a team effort from the first game to the last. Tim, what an innings. Noor, a brilliant spell with the ball and wickets at… pic.twitter.com/fNOO18Wpfe — Dr. Sanjiv Goenka (@DrSanjivGoenka) August 16, 2026
मँचेस्टर सुपरजायंट्स हा संघ पूर्वी मँचेस्टर ओरिजिनल्स म्हणून ओळखला जात होता. या वर्षी, संजीव गोएंका यांनी संघाची मालकी घेतली आणि फ्रँचायझीचे नाव बदलून मँचेस्टर सुपरजायंट्स असे ठेवले. आपल्या पहिल्याच हंगामात विजेतेपद जिंकल्यामुळे हा बदल अविस्मरणीय ठरला.