
Disappointment for football fans! Cristiano Ronaldo will not come to India; What is the real reason? Read in detail
जेव्हा रोनाल्डोकडून अल-नासरशी करार करण्यात आला तेव्हा सौदी अरेबियाबाहेर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यांमधून तो स्वतःला बाहेर ठेऊ शकत होता अशी तरतूद होती. आता याच तरतुदीनुसार, ख्रिस्तियानो रोनाल्डोने गोव्याविरुद्धच्या सामन्यातून त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती समोर येत आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो २०२६ च्या फिफा विश्वचषकासाठी जय्यत तयारी करत आहे. ४० वर्षीय रोनाल्डो विश्वचषकासाठी त्याच्या कामाचा भार सांभाळत असून त्याचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी, तो पुढील विश्वचषकात पोर्तुगालकडून खेळण्यासाठी कमी सामने खेळण्याचे बघत आहे. मागील दोन सामन्यांमध्ये रोनाल्डो संघाचा भाग नव्हता.
तथापि, कर्णधार रोनाल्डोच्या गैरहजेरीत देखील अल-नासरकडून गेल्या दोन सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करण्यात आली आहे. संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत आणि पुढील फेरीत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा : BAN vs WI : वेस्ट इंडिजने क्रिकेट इतिहासात रचला आगळावेगळा विक्रम! ODI क्रिकेटमध्ये प्रथमच घडले
एफसी गोवा आणि अल-नासर एएफसी चॅम्पियन्स लीग २ मध्ये एकाच गटात असून दोन्ही संघ दोन वेळा आमनेसामने येणार आहेत. गोव्यानंतर, दोन्ही संघ रियाधमध्ये भेटणार आहेत. ख्रिस्तियानो रोनाल्डो रियाध सामन्यात खेळण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहेत.