ऑस्ट्रेलिया संघ(फोटो-सोशल मीडिया)
IND vs AUS 2nd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा ७ विकेट्सने पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता अॅडलेड ओव्हल येथे खेळवला जाणार आहे. मिशेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार. यासाठी, पहिल्या सामन्यातील अनुभवाचा आधार घेत संघाने जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.
हेही वाचा : IND VS AUS 2nd ODI : अॅडलेडच्या मैदानावर भारताचा रेकॉर्ड कसा? आकडेवारीने स्पष्ट केले सारेच गणित
अडलेड सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात दोन मोठे बदल केले गेले आहे. पहिला बदल म्हणजे स्पिनर अॅडम झम्पाचे संघात पुनरागमन होणार आहे. झम्पा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे पहिल्या सामन्यासाठी तो संघाचा होऊ शकला नव्हता, परंतु आता तो पूर्णपणे सज्ज झाला आहे. झम्पाच्या पुनरागमनामुळे पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या मॅथ्यू कुहनेमनला वगळण्यात आले आहे.
दुसरा बदल म्हणजे यष्टीरक्षक-फलंदाज अॅलेक्स कॅरीचे संघात पुनरागमन झाले आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात केरी शेफील्ड शिल्ड सामना खेळत असल्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नव्हते. तो आता थेट संघात सामील होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जोश इंगलिस दुखापतीमुळे अद्याप संघात परतलेला नाही. त्याच्या अनुपस्थितीत, मागील सामन्याचा नायक जोश फिलिप याला कायम ठेवण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज बेन द्वारशुइस देखील दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडणार आहे.
ऑस्ट्रेलियाकडून संघात केलेले बदल मागील सामन्यातून मिळालेल्या धड्यांवर आधारित संघाला बळकट करणे आणि रणनीती सुधारणे हे आहेत. झांपा आणि केरीच्या पुनरागमनामुळे संघाचे संतुलन सुधारणार आहे. ऑस्ट्रेलिया गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही विभागात बळकट होणार आहे. ज्यामुळे त्यांना दुसरा एकदिवसीय सामना जिंकण्यासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहेत.
हेही वाचा : IND vs AUS : अॅडलेडमध्ये ‘या’ पाच खेळाडूंनी फटकावल्या सर्वाधिक धावा! वाचा खेळाडूंची यादी
ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, जोश फिलिप (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, अॅडम झांपा, जोश हेझलवुड, मार्नस लाबुशेन, झेवियर बार्टलेट, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक).