Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

” ‘तो’ आमच्यासाठी प्रेरणास्थान…” CSK चा कर्णधार नेमका कोणाबद्दल बोलला? वक्तव्याची होतेय चर्चा…

सामना सुरु होण्यापूर्वीच CSK चा कर्णधार ऋतूराज गायकवाड याने दिलेल्या मुलाखतीतील वक्तव्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 23, 2025 | 06:57 PM
"'तो' आमच्यासाठी प्रेरणास्थान..." CSK चा कर्णधार नेमका कोणाबद्दल बोलला? वक्तव्याची होतेय चर्चा...

"'तो' आमच्यासाठी प्रेरणास्थान..." CSK चा कर्णधार नेमका कोणाबद्दल बोलला? वक्तव्याची होतेय चर्चा...

Follow Us
Close
Follow Us:

CSK vs MI :  IPL 2025 ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आज चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात सामना रंगणार आहे. या दोन्ही संघात आतापर्यंत 37 सामने झाले असून 20 वेळा मुंबई इंडियन्सने विजयाची ट्रॉफी जिंकण्याचा बहुमान पटकावला तर चेन्नई सुपर किंग्जने देखील 17 सामन्यांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे यंदाचा हा दोन्ही संघाचा पहिला सामना रंगणार आहे. त्यामुळे चाहते देखील मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत. या दरम्यान सामना सुरु होण्यापूर्वीच CSK चा कर्णधार ऋतूराज गायकवाड याने दिलेल्या मुलाखतीतील वक्तव्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काय म्हणाला कर्णधार ऋतूराज गायकवाड ?

चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) हे दोन्ही संघाचा आज पहिलाच सामना रंगणार आहे. या दरम्य़ान CSK संघाचा कर्णधार ऋतूराज गायकवाड याने संघातील एका खेळाडूबाबत केलेल्या वक्तव्याने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. CSK चा माजी कर्णधार धोनी देखील यावेळी खेळताना दिसणार आहे. दरम्यान धोनीच्या निवृत्तीबाबत ऋतूराजला विचारलं असता त्याने सांगितलं की, धोनी हा संयमी आणि अभ्यासू खेळाडू आहे. धोनी आता 43 वर्षांचा आहे. आता पर्यंतची त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. गेल्या दोन तीन वर्षात CSK संघाने बरीच मेहनत घेतली आहे. त्यामुळे आशा आहे की, धोनी पुढे CSK साठी दमदार खेळी खेळत राहील.

” ‘तो’ आमच्यासाठी प्रेरणास्थान…”

ऋतूराज पुढे असंही म्हणाला की, धोनीचा सराव हा अभ्यासपूर्ण असतो. त्याला जे काही मिळवायचं आहे किंवा संघासाठी कशा पद्धतीने खेळता येईल याचा तो अभ्यास करुन सराव करत असतो. त्याची खेळण्याची जिद्द , त्याची ऊर्जा यामुळे माझ्यासाठी आणि संपूर्ण CSK संघासाठी धोनी आमचा प्रेरणास्थान आहे. शक्य तितके षटकार मारणं, योग्य स्विंग मिळवणं, सर्वोत्तम फॉर्ममध्ये राहणं यासाठी त्याचा प्रयत्न सुरु असतो,” त्याची जिद्द आणि चिकाटी आम्हाला कायमच खेळण्य़ाची प्रेरणा देते. आतापर्य़ंत संघात अनेक नविन खेळाडू आले आहेत त्यांनाही तो योग्यरित्या मार्गदर्शन करतो.

ऋतूराजने बोलताना पुढे सचिन तेंडुलकरचाही उल्लेख केला आहे. तो म्हणाला की, वयाचा आणि खेळाचा तसा फार काही संबंध येत नाही. सचिन तेंडुलकर देखील 50 वर्षांचा असतानाही ज्या ताकदीने फलंदाजी करत आहे. त्याच ताकदीने धोनी देखील उत्तम फलंदाजी करत आहे. मला वाटते की (धोनीसाठी) अजून बरीच वर्षे बाकी आहेत, आणि त्याने CSK संघासाठी आणखी काही काळ खेळायला पाहिजे. ऋतूराजच्या या वक्तव्य़ावर धोनी आणि CSK च्या चाहत्यांनी समाधान व्य़क्त केलं आहे. चेन्नईच्य़ा चेपॉक स्टेडियमवर आज दोन्ही संघ आमनेसामने भिडणार आहे. CSK vs MI या दोन्ही संघांचा यंदाचा हा पहिलाच सामना असून कोण बाजी मारणार हे पाहणं औस्त्युक्याचं ठरणार आहे.

Web Title: Csk captain rituraj gaikwad said on dhonis retirement that ms dhoni is our inspiration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 06:57 PM

Topics:  

  • CSK
  • MS Dhoni Captain
  • Ruturaj Gaikwad

संबंधित बातम्या

आऊट न होता 59 धावा काढून Ayush Mhatre ने का सोडले मैदान, Vaibhav Sooryavanshi च्या मित्राबरोबर नक्की काय घडले?
1

आऊट न होता 59 धावा काढून Ayush Mhatre ने का सोडले मैदान, Vaibhav Sooryavanshi च्या मित्राबरोबर नक्की काय घडले?

CSK Vs DC Live: दिल्लीचे ‘धुरंदर’ चेन्नईवर भारी ठरणार की…; अक्षर पटेलने घेतला ‘हा’ निर्णय
2

CSK Vs DC Live: दिल्लीचे ‘धुरंदर’ चेन्नईवर भारी ठरणार की…; अक्षर पटेलने घेतला ‘हा’ निर्णय

यंदा CSK चं खरं नाही! MS Dhoni लवकरच मैदानात? समोर आली महत्वाची अपडेट
3

यंदा CSK चं खरं नाही! MS Dhoni लवकरच मैदानात? समोर आली महत्वाची अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.