Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Syed Mushtaq Ali Trophy : महाराष्ट्राचा संघ जाहीर; गायकवाड-पृथ्वी शॉवर असणार अनेकांच्या नजरा

Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा १८ सदस्यीय संघ जाहीर. ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ आणि रामकृष्ण घोषचा संघात समावेश. १४ नोव्हेंबरला पहिला सामना.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 09, 2026 | 05:44 PM
Syed Mushtaq Ali Trophy : महाराष्ट्राचा संघ जाहीर; गायकवाड-पृथ्वी शॉवर असणार अनेकांच्या नजरा

Syed Mushtaq Ali Trophy : महाराष्ट्राचा संघ जाहीर; गायकवाड-पृथ्वी शॉवर असणार अनेकांच्या नजरा

Follow Us
Follow Us:
  • दुखापतीनंतर रामकृष्ण घोषचे पुनरागमन
  • 14 नोव्हेंबरला पहिला सामना
  • अद्याप संघाचा कर्णधार घोषित नाही
 

सय्यद मुश्ताक अली टी-20 चषक (Syed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या 18 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघातील फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि आक्रमक सलामीवीर पृथ्वी शॉ यांचा संघात समावेश हे प्रमुख आकर्षण असणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (MCA) सोमवारी संघ जाहीर केला. मात्र, अद्याप संघाच्या कर्णधाराचे नाव घोषित करण्यात आलेले नाही.

महाराष्ट्राचे साखळी फेरीतील सर्व सामने 14 ते 26 नोव्हेंबरदरम्यान मोहाली आणि न्यू चंडीगड येथे खेळवले जाणार आहेत. गायकवाड सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघासोबत आहे. ही मालिका 15 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे त्याच्या महाराष्ट्र संघातील उपलब्धतेकडे लक्ष लागले आहे.

गायकवाड आणि पृथ्वी शॉ यांच्यासह राहुल त्रिपाठी, साहिल पारख, सिद्धेश वीर आणि अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी यांचाही संघात समावेश आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मुकेश चौधरीवर असू शकते. डावखुरा फिरकीपटू विक्की ओस्तवाल मधल्या षटकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

रामकृष्ण घोषचे पुनरागमन

चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल 2026 मध्ये खेळताना पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे स्पर्धेबाहेर झालेल्या वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू रामकृष्ण घोषचे या स्पर्धेतून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन होणार आहे. त्याच्या समावेशामुळे महाराष्ट्राच्या अष्टपैलू फळीला बळ मिळणार आहे.

संघात सूरज शिंदे, तनाय संघवी, किरण चोरमले, रंजीत निकम, प्रदीप दाधे, ऋषिकेश सोनवणे, विवेक शेलार, हितेश वालुंज आणि प्रशांत सोलंकी यांनाही संधी देण्यात आली आहे.

IND Vs NZ: गिलची सेना किवींना ‘किल’ करण्यासाठी सज्ज! सिरीज जिंकण्याची संधी तर, Playing 11 मध्ये…

14 नोव्हेंबरला पुडुचेरीशी पहिली लढत

एलिट गट ‘क’ मध्ये समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या संघाला पहिला सामना 14 नोव्हेंबरला मोहाली येथे पुडुचेरीविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर 16 नोव्हेंबरला न्यू चंडीगड येथे केरळशी सामना होईल. 18 नोव्हेंबरला हिमाचल प्रदेश, तर 20 नोव्हेंबरला आसामविरुद्ध महाराष्ट्राचा संघ मैदानात उतरेल.

यानंतर 22 नोव्हेंबरला मध्य प्रदेश, 24 नोव्हेंबरला त्रिपुरा आणि 26 नोव्हेंबरला आंध्र प्रदेशविरुद्ध महाराष्ट्राचे सामने होतील.

IPL बाबत ललित मोदीचं वक्तव्य ऐकतलं का? थेट बाजारंच उठवला

महाराष्ट्राचा १८ सदस्यीय संघ : पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, अर्शिन कुलकर्णी, साहिल पारख, राहुल त्रिपाठी, सूरज शिंदे, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, तनाय संघवी, विक्की ओस्तवाल, किरण चोरमले, रंजीत निकम, प्रदीप दाधे, ऋषिकेश सोनवणे, विवेक शेलार, हितेश वालुंज, प्रशांत सोलंकी आणि सिद्धेश वीर.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सय्यद मुश्ताक अली करंडकासाठी महाराष्ट्राचा किती सदस्यीय संघ जाहीर झाला?

    Ans: महाराष्ट्राचा १८ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे.

  • Que: महाराष्ट्राच्या संघात कोणते प्रमुख खेळाडू आहेत?

    Ans: ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, राहुल त्रिपाठी, मुकेश चौधरी आणि अर्शिन कुलकर्णी यांचा समावेश आहे.

  • Que: महाराष्ट्राचा पहिला सामना कधी आणि कोणाविरुद्ध आहे?

    Ans: १४ नोव्हेंबरला मोहाली येथे पुडुचेरीविरुद्ध महाराष्ट्राचा पहिला सामना होईल.

Web Title: Maharashtra 18 member squad syed mushtaq ali trophy rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • MCA
  • Prithvi Shaw
  • Ruturaj Gaikwad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.