CSK vs GT: Big blow to Dhoni's team in IPL 2025! Something that happened for the first time in 18 years with CSK, read in detail..
CSK vs GT : आयपीएल २०२५ च्या ६७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा ८३ धावांनी धुव्वा उडवला आहे. या विजयासह चेन्नईने या हंगामचा शेवट गोड केला आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत २३० धावांचा डोंगर उभा केला. या दरम्यान चेन्नईकडून डेवाल्ड ब्रेव्हिस नेशानदार कामगिरी करत अर्धशतक झळवले. प्रतिउत्तरात गुजरात टायटन्स खास काही करू शकले नाही. त्यांचा संघ १८ षटकात सर्वबाद १४७ धावात गारद झाला. काल चेन्नई सुपर किंग्ज या हंगामातील शेवटचा सामना खेळला. या विजयानंतरही, ते आयपीएल २०२५ मध्ये शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जने पॉइंट्स टेबलमध्ये तळाशी राहण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
१८ वर्षांच्या १६ हंगामात, २०२० मध्ये ८ संघांच्या स्पर्धेत चेन्नई सातव्या स्थानावर राहिला होता. तर २०२२ मध्ये, जेव्हा १० संघ होते, तेव्हा चेन्नई संघाला ९ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. चेन्नई संघाने हंगाम शेवटच्या स्थानावर संपवण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. चेन्नईसाठी आयपीएल २०२५ चा हंगाम खूपच वाईट गेला आहे. चेन्नईला यंदाच्या १४ पैकी फक्त ४ सामने जिंकता आले. सीएसकेने ८ गुण घेऊन आपल्या प्रवासाचा शेवट केला.
तथापि, राजस्थान रॉयल्सने देखील आपला प्रवास ८ गुणांसह संपवला आहे. पण राजस्थानचा धावगती चेन्नईपेक्षा चांगली राहिली आहे. ज्यामुळे राजस्थान संघ ९ व्या स्थानावर विराजमान झाला आहे. जर चेन्नईने गुजरातला १९९ धावांनी हरवले असते तर त्यांना नवव्या स्थानावर पोहचता आले असते. पण हे शक्य होऊ शकले नाही.
एक मजेशीर गोष्ट अशी की, आजच्या आधी, सीएसके हा मूळ आठ फ्रँचायझींपैकी एकमेव संघ होता जो आयपीएलमध्ये शेवटच्या स्थानावर आजवर राहिला नव्हता. सध्याच्या १० संघांपैकी फक्त जीटी आणि लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) हे संघ पॉइंट टेबलच्या तळाशी राहिलेले नाहीत, परंतु गेल्या तीन हंगामांपासून ते लीगमध्ये खेळत आहेत.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २३० धावा केल्या. प्रत्युत्तरात, गुजरात टायटन्स लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरले आणि त्यांना १४७ धावांवर सर्वबाद केले. चेन्नईने हा सामना ८३ धावांनी जिंकला आहे. या विजयासह चेन्नईने या हंगामचा शेवट गोड केला आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत २३० धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात गुजरात टायटन्स खास काही करू शकले नाही. त्यांचा संघ १८ षटकात सर्वबाद १४७ धावात गारद झाला.